रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सावधान! महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, १२ जणांचा मृत्यू तर…; लस घेऊनही आजार का होतो?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 30, 2025 | 12:14 pm
in Lifestyle
Reading Time: 1 min read
google-news
covid cases in india

सावधान! महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, १२ जणांचा मृत्यू तर...; लस घेऊनही आजार का होतो?

2020-21 मध्ये करोना व्हायरसमुळे संपूर्ण जगच ठप्प झालं होतं. परिणामी देशभरातही करोनाचे अनेक रुग्ण समोर आले. दरम्यान महाराष्ट्रातही करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते. अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना या आजारात गमावलं. नंतर झपाट्याने औषधोपचार आले, लस आली त्यानंतर करोनाचा प्रभाव कमी झाला. आता पुन्हा हा आजार वर डोकं काढू पाहत आहे. महाराष्ट्राबरोबरच देशातही करोना रुग्णांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुन्हा राज्याच्याही विविध भागांमध्ये करोनाचे रुग्ण समोर येत आहेत. सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही संख्या कमी होती. मात्र आता यामध्ये वेगाने वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. (covid cases in india)

कुठे किती रुग्ण?

करोनाचा सध्याचा वाढता प्रभाव पाहता प्रशासनाने नियमांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे. घाबरुन न जाता स्वतःची योग्य त्या पद्धतीने काळजी घेण्याचं सांगण्यात येत आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, सध्या महाराष्ट्रात ४२५ करोना बाधित रुग्ण आहेत. मुंबईत ही संख्या २७ तसेच पुण्यामध्ये २१ आहे. ठाण्यातही तब्बल करोनाचे १२ रुग्ण आहे. देशभरात तर करोना आणखीनच झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत देशभरातील करोना रुग्णांची संख्या १२०० पर्यंत पोहोचली आहे. या सगळ्यामध्ये १२ रुग्णांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला.

आणखी वाचा – अपघातानंतर जवळपास एक महिन्याने घरी परतला पवनदीप राजन, आता परिस्थिती नेमकी कशी?, फोटो समोर

करोनाचा पुन्हा शिरकाव का?

नव्या ७६ करोना रुग्ण महाराष्ट्रात समोर आले. त्यामुळे सध्या चिंताग्रस्त वातावरण आहे. आरोग्य यंत्रणेच्या आदेशानुसार काही रुग्णालयांमध्ये करोनासाठी पुन्हा विशेष सेवा व व्यवस्था तयारही ठेवण्यात आली आहे. करोना संदर्भातील लस घेतल्यानंतरही पुन्हा हा आजार होण्याची भीती निर्माण झाली आहे. लस घेतल्यानंतर अजूनही करोना आजाराशी प्रतिकार करु शकतो. मात्र आता या आजाराच्या तीव्रतेमध्ये काही बदल झाले आहेत. लस घेतल्यामुळे आताच्या करोनाचा प्रभाव रुग्णांवर थोड्याफार प्रमाणातच होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा – “अर्धवट माहिती देऊन…”, प्राची पिसाटच्या गंभीर आरोपांवर सुदेश म्हशीलकरांनी सोडलं मौन, म्हणाले, “यामुळे माझं कुटुंब…”

कोविड-१९ चे नवीन प्रकार

केरळ व महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं काही रिपोर्ट्सनुसार निदर्शनास आलं. एनबी.१.८.१. आणि एलएफ.७ करोनाचे काही नवे प्रकार समोर आले आहेत. मात्र या वर्षामध्ये वर डोकं काढू पाहणारा करोना बदलला आहे. सर्दी, खोकला, ताप, अशी काही लक्षणं आताच्या करोना रुग्णांमध्ये आहेत. मात्र या नव्या कोविड-१९ आजाराच्या प्रकाराला लस घेतल्यामुळे रुग्ण मात करु शकतात.

Tags: health newstrending news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
casting couch incident

"तुझे अंतर्वस्त्र काढून माझ्या हातात दे", बॉलिवूड अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची विचित्र मागणी, संतापून म्हणाली, “मार इथे खाणार की…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.