शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

टीव्हीवर आली बिनधास्त मुलगीची आजी, सेलिब्रिटीही आहेत तिचे फॅन, स्टेजवर जाताच अलका कुबल यांना घट्ट मिठी मारली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जून 6, 2024 | 2:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Content creator bindhast mulgi aka Gauri Pawar shared a post about her grandmother's wish to meet actress Alka Kubal.

टीव्हीवर आली बिनधास्त मुलगीची आजी, सेलिब्रिटीही आहेत तिचे फॅन, स्टेजवर जाताच अलका कुबल यांना घट्ट मिठी मारली अन्...

सध्या सोशल मीडियावर कंटेट क्रिएटर्सची चांगलीच चलती आहे. सोशल मीडियावरील अनेक कंटेट क्रिएटर्स आपल्या आगळ्यावेगळ्या कंटेटने नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असतात. यापैकीच एक म्हणजे लोकप्रिय व प्रसिद्ध कंटेट क्रिएटर म्हणजे ‘बिनधास्त मुलगी’ फेम गौरी पवार. छोटीशी दिसणारी पण आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी गौरी पवार सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

गौरी ही तिच्या आजीबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे तिच्यासह तिची आजीही सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रियता असल्याचे पाहायला मिळते. मोबाईलच्या स्क्रीनवरील या आजी-नातीच्या लोकप्रिय जोडीने नुकतीच टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी गौरीच्या आजीने अलका कुबल यांच्याबरोबर खास डान्स केला. याबद्दल गौरीने तिच्या सोशल मीडियावर एक  खास पोस्ट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Gauri Pawar (भावा) 🇮🇳 (@bindhast_mulgi)

या पोस्टमध्ये गौरीने असं म्हटलं आहे की, “आजीला टीव्हीवर घेऊन येणे हे माझे एक स्वप्न होते. जे दोन वेळा साकारही झाले. पण यावेळी आजी तिची आवडती अभिनेत्री म्हणजेच अलका कुबल यांना भेटणार होती. ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’च्या शोमध्ये आम्ही प्रेक्षकांमध्ये बसलेलो असताना आजीने मला “अलका कुबल माझ्याबरोबर एक फोटो काढतील का?” असा प्रश्न विचारला. यानंतर स्टेजवर जाताच आजी व अलका कुबल यांनी एकमेकींना इतकी घट्ट मिठी मारली की, जणू काही त्या दोघी अगदी जुन्या मैत्रिणीच आहेत आणि हे सगळं पाहून आमच्या सर्वांच्या डोळ्यांत पाणी आले”.

आणखी वाचा – राजाध्यक्षांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुपाली रुग्णालयात दाखल, पुन्हा फसवणूकीचा डाव, नेत्रा कसं सोडवणार कोडं?

यापुढे गौरीने असं म्हटलं आहे की, “सगळे मला म्हणतात की, तुझ्यामुळे आजी हे दिवस जगत आहे. पण मला असं वाटतं की आम्ही दोघी एकमेकींसाठी मैत्रिणी आहोत. आजी नेहमी असं म्हणते की, “आज गौरामुळे मी आहे आणि माझ्यामुळे गौरा”. पण हे सगळं शक्य झालं ते तुम्हा सर्व प्रेक्षकांमुळे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार. फक्त कुटुंब असून चालत नाही. आपले काही मित्रही असतात, ज्यांचा आपल्या आयुष्यात मोठा वाटा असतो”.

आणखी वाचा – अमोलने काढलं आई-वडिलांचं चित्र, अर्जुनचं सत्य सिंबाला माहित झाल्याचे अप्पीला कळणार का?, पुढे काय घडणार?

दरम्यान, गौरीने शेअर केलेल्या या पोस्टला तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या पोस्टवर गौरी व आजीच्या अनेक चाहत्यांसह अभिनेत्री अलका कुबल यांनीही कमेंट केली आहे. गौरीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. a

Tags: alka kubalGauri Pawarmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Aai Kuthe Kay Karte Promo

नको नको ते बोलला तरी लेकाच्या मदतीला आईच धावली, अरुंधतीने अभिषेकला केली पैशांची मदत, संजनाचा मात्र उलटाच न्याय

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.