Bharti Singh Talks About Bad Touch : टेलिव्हिजन अभिनेत्री भारती सिंगने तिच्या विनोदी अंगाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. भारती सिंगचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आजवर भारतीने तिच्या सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. भारतीचे फनी व्हिडीओ नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतात. भारतीचा सिनेविश्वातील स्ट्रगल काही सोपा नव्हता. तिने कोणताही वारसा हक्क नसताना स्वमेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं. भारती नेहमीच हसताना दिसली तरी तिने तिची कधीच दुःख जगासमोर आणली नाहीत. अशातच भारतीने तिच्याबरोबर घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
भारतीने ती कॉलेजमध्ये असताना तिच्याबरोबर झालेल्या चुकीच्या स्पर्शाबाबत भाष्य केलं आहे. त्यावेळी तिला गुड टच, बॅड टच माहित नव्हता याबाबतही ती स्पष्टपणे बोलली. राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत भारतीने या धक्कादायक प्रकाराबाबत सांगितलं. भारती म्हणाली, “जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा मी कॉलेजमध्ये कॉमेडी स्किट सादर करण्यासाठी जायचे. तेव्हा मला काही समजत नव्हतं. आजकाल मुलांना ‘चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श (गुड टच, बॅड टच) शिकवतात, पण मला तेव्हा काहीच माहीत नव्हतं”.
आणखी वाचा – “ऑडिशनसारखी फालतू काम करत नाही”, ऑडिशन मागताच उषा नाडकर्णी भडकल्या, म्हणाल्या, ” स्क्रिप्ट फेकली आणि…”
अभिनेत्री म्हणाली, “मी कॉलेजमधून तीन दिवस सुट्टी घ्यायचे आणि माझ्या मित्रांच्या कॉलेजला जायचे. मी सकाळी ५ वाजताची बस पकडायचे. त्या बसमध्ये सर्व लोक दूधवाले होते. जागा नसायची. दीड वर्ष मला समजलं नाही की, ते माझी छेड काढायचे. जेव्हा कोणीतरी मला घट्ट पकडलं, तेव्हा मला थोडंफार समजलं; पण तरीही मी विचार करीत राहिले की, तो पडत असेल आणि त्याचा हात त्याच ठिकाणी लागला असेल”.
आणखी वाचा – ट्रकने प्रवास करत सेट गाठला आणि…; ‘कोण होतीस तू…’ मालिकेच्या कलाकारांची भर पावसात तारांबळ, व्हिडीओ समोर
शेवटी भारती म्हणाली, “मी जशी मोठी झाली तेव्हा मला ‘गुड टच आणि बॅड टच’बाबत समजलं. आम्हाला कधीच कोणी याबाबत सांगितलं नाही. त्याबद्दल आई आणि बहिणीही बोलण्यास लाजत होत्या. जेव्हा मला हे समजलं, तेव्हा माझ्यातील भारती खऱ्या अर्थाने जागी झाली आणि मी अनेक लोकांना कोपरा मारला. माझ्यापेक्षा मोठ्या मुलांनाही मी मारलं, भलेही नंतर माझे हात थरथरले. ही छेडछाड बसमध्ये व्हायची”.





