Usha Nadkarni expressed her regret : उषा नाडकर्णी हे नाव घराघरात पोहचले आहे याचं कारण त्यांनी साकारलेली खाष्ट सासू. ‘माहेरची साडी’ हा सिनेमा ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका आणि ‘पर्याय’ हे नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी साकारलेली सासू त्यांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. अत्यंत रोखठोक आणि स्पष्टवक्त्या स्वभावाच्या म्हणून उषा नाडकर्णी प्रसिद्ध आहेत. सुस्पष्ट आवाज, फटकळ स्वभाव आणि रोखठोक बोलणं यामुळे उषा नाडकर्णीचा दबदबा कायम आहे. सिनेमासृष्टी आणि मालिका विश्वात त्या लीलया पेलवत आहेत. चित्रपट आणि मालिकामध्येही त्यांनी स्वतःच स्थान निर्माण केलं. त्यांना सिनेसृष्टीत आउ या नावाने हाक मारली जाते.
आज वयाच्या ७८व्या वर्षीही उषा नाडकर्णी एकट्याच राहतात. याबाबत त्यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये भाष्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उषा यांनी त्यांच्या एकटे राहण्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, “माझ्या मुलाला नॉनव्हेज खूप आवडतं पण तो माझ्या बरोबर राहत नाही. तो माझ्या भावाच्या घरी बोरिवलीला राहतो. मी एकटी राहते. सकाळी उठते. नाश्ता बनवते, जेवण करते. आंघोळ करुन देवाची पूजा करते. जेवते मग फेसबुक बघत बसते. लग्नानंतर मुलगा भावाच्या फ्लॅटमध्ये राहू लागला. कारण त्याचं घर मोठं होतं. त्याला एक मुलगा आहे त्यामुळे त्याची देखभाल करणं सोपं होतं”.
आणखी वाचा – बसमधील दूधवाल्याने घट्ट पकडलं आणि…; बॅड टचबाबत भारती सिंगच धक्कादायक भाष्य, म्हणाली, “मला समजलं नाही…”
पुढे त्या म्हणाल्या, “माझा भाऊ बोरिवलीला 2BHKच्या घरात राहतो. आता ते घर रिडेव्हलपमेंटमध्ये 3BHK झालं आहे. माझ्या मुलाला छोटी मुलगी आहे. त्यामुळे भावाने त्याला तिथे बोलावून घेतलं. लहान मुलं सगळ्यांना चांगली वाटतात, त्यामुळे तो मुलीला घेऊन तिथे राहतो”, असंही उषा ताईंनी सांगितलं. उषा ताईंचा संसार आणि त्यांच्या मुलाला सांभाळण्यात त्यांच्या आईने आणि भावाने खूप मदत केली. त्यांनी सांगितलं की, “माझे वडील फार लवकर गेले. त्यानंतर मम्मीने आम्हाला सांभाळलं. माझ्या मुलाला सांभाळण्यात आई-बाबा आणि भावाने खूप मदत केली”.
आणखी वाचा – “ऑडिशनसारखी फालतू काम करत नाही”, ऑडिशन मागताच उषा नाडकर्णी भडकल्या, म्हणाल्या, ” स्क्रिप्ट फेकली आणि…”
एकट राहण्याबद्दल उषा ताई म्हणाल्या, “सुरूवातीला खूप भिती वाटायची पण आता सवय झाली आहे. मी आधी या बिल्डिंगमध्ये एकटी राहायला आली तेव्हा खूप भिती वाटायची, मी रात्री उशिरा यायचे तेव्हा वॉचमनला सांगायचे की, दादा माझ्याबरोबर वरती चला. पण आता काही नाही, आता सवय झाली आहे.”





