आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित पुरस्कार ‘एमी इंटरनॅशनल अवॉर्ड २०२३’ची नुकतीच घोषणा झाली आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता व स्टॅन्ड अप कॉमेडियन वीर दासने या पुरस्कारावर नाव कोरत इतिहास रचला. वीर दासला ‘नेटफ्लिक्स’ वरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘वीर दास : लँडिंग’साठी पुरस्कार मिळाला असून तो हा पुरस्कार पटकावणारा पहिला भारतीय कॉमेडियन ठरला आहे. त्याचबरोबर, बॉलिवूड निर्माती एकता कपूरला देखील एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर, अभिनेत्री शेफाली शाह आणि अभिनेता जीम सरब यांना यंदाच्या पुरस्कारासाठी नामांकने मिळाली आहेत. (Veer Das and Ekta Kapoor wins Emmy International Awards 2023)
वीरच्या ‘वीर दास : लँडिंग’ला सर्वोत्कृष्ट कॉमेडी शोचा पुरस्कार मिळाला. या शोबरोबर ‘डेरी गर्ल्स : सीझन ३’ या ब्रिटिश शोला देखील हा पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान, वीरला या पुरस्कारासाठी दुसऱ्यांदा नामांकन मिळाले असून याआधी २०२१ मध्ये आलेल्या ‘टूर इंडिया’ या शोसाठी पहिल्यांदा नामांकन मिळाले होते. दरम्यान, हा पुरस्कार पटकावल्यानंतर अभिनेत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो यावेळी म्हणाला, “हा क्षण माझ्यासाठी एका स्वप्नासारखं आहे. माझ्या शोला ‘कॉमेडी कॅटेगरी’चा एमी पुरस्कार मिळवणं हे केवळ माझ्यासाठी नाही, तर संपूर्ण भारतीय कॉमेडीसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या ‘वीर दास : लँडिंग’ शोचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे.”
हे देखील वाचा – Ind VS Aus : अंतिम सामन्यावरून अभिनेता गश्मीर महाजनीचा अमिताभ बच्चन यांना टोमणा, म्हणाला, लपून मॅच पाहिली म्हणून…
We have a Tie! The International Emmy for Comedy goes to "Vir Das: Landing” produced by Weirdass Comedy / Rotten Science / Netflix#iemmyWIN pic.twitter.com/XxJnWObM1y
— International Emmy Awards (@iemmys) November 21, 2023
वीर दाससह बॉलिवूड निर्माती एकता कपूरला चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचा एक व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हे देखील वाचा – Ind VS Aus : कपिल देव यांना अंतिम सामन्याचं आमंत्रण नसल्याचं आलं समोर, मराठी अभिनेत्याची संतापजन पोस्ट, म्हणाला, “लाज वाटली…”
एकीकडे वीरला मिळालेल्या पुरस्काराची चर्चा होत असताना अभिनेत्री शेफाली शाह व जीम सरब यांना देखील या पुरस्कारासाठी नामांकने मिळाली. शेफालीला ‘दिल्ली क्राईम २’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, तर जीमला ‘रॉकेट बॉईज २’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन मिळालं होतं. मात्र, या दोघांना या पुरस्कारावर नाव कोरण्यात अपयश आले.