शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुनील पालचं झालेलं अपहरण, अपहरणकर्त्यांनी मागितलेल्या रकमेतून खरेदी केले दागिने, पोलिसांचा मोठा खुलासा

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 9, 2024 | 4:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
comedian Sunil Pal kidnappers bought jewelery worth 6 lakhs from Meerut

सुनील पाल यांच्याकडून खंडणी घेतल्यानंतर अपहरणकर्त्यांनी मेरठमधून लाखोंचे दागिने, पोलिसांनी दिली माहिती

प्रसिद्ध, लोकप्रिय विनोदवीर सुनील पाल बेपत्ता असल्याची माहिती समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. कामासाठी गेलेले सुनील कुठे आहेत?, कसे आहेत? याबद्दल कोणालाच काहीच कल्पना नव्हती. शिवाय त्यांचा फोनदेखील बंद असल्याने कुटुंबियांची चिंता आणखी वाढली. सुनील यांच्याबरोबर काहीही संपर्क होऊ शकत नसल्यामुळे त्यांची पत्नी सरिता पाल यांनी सांताक्रुझ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. अखेर पोलिसांनी सुनील यांचा शोध लावला. अशातच आता सुनील पाल यांनी अपहरणाबाबत आणखी एक खुलासा केला आहे. (sunil pal kidnapping news)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पाल यांच्याकडून खंडणी घेतल्यानंतर अपहरणकर्त्यांनी मेरठमधून लाखोंचे दागिने विकत घेतले. मेरठ शहराचे एस.पी. आयुष विक्रम यांनी नुकतीच ही माहिती दिली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी दोन ज्वेलर्सची खाती गोठवल्याचेही म्हटलं जात आहे. मेरठ शहराचे एसपी आयुष विक्रम यांनी नुकतीच या प्रकरणी नवी माहिती दिली आहे. याबद्दल त्यांनी असं सांगितलं की, “काही दिवसांपूर्वी ज्वेलर्सनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, मुंबई पोलिसांनी त्यांची खाती गोठवली आहेत. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी मुंबई पोलिसांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितले की, ऑनलाईन फसवणुकीमुळे ही खाती गोठवली गेली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sunil Pal Comedian (@sunilpalcomedian)

आणखी वाचा – “मला तिच्या रुपात मुलगीच झाली अन्…”, मृणाल कुलकर्णींनी सांगितलं सूनेबरोबरचं नातं, म्हणाल्या, “देवाने थेट…”

सध्या हा फ्रीज काढून टाकण्यात आला आहे. मात्र यामध्ये वापरलेले पैसे लिंकवर ठेवण्यात आले आहेत. याबाबत अद्याप चौकशी सुरु आहे”. ज्वेलर्सनी ही रक्कम ६ लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. हे खाते काही फसवणुकीशी निगडीत असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे खाती गोठवण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पालचे अपहरण केल्यानंतर त्यांना मेरठमध्ये सोडण्यात आले होते. खंडणी गोळा केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी तेथील एका ज्वेलरी दुकानातून काही दागिनेही खरेदी केले.

आणखी वाचा – बजरंगच्या मदतीने अक्षरा समोर आणणार सासूचं सत्य, भुवनेश्वरीचा पर्दाफाश होणार?, अधिपती कुणाची बाजू घेणार?

या दागिन्यांचे आर्थिक व्यवहार सुनील पाल यांच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू केला. याशिवाय पोलीस ज्वेलरी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरऱ्यांचीही पाहणी करत आहेत. त्यामुळे आता यामध्ये पुढे काय चौकशीमध्ये काय माहिती मिळणार हे पोलिसांच्या मदतीने समोर येईल

Tags: comedian sunil pal kidnapping caseSunil Pal kidnapperssunil pal kidnapping news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Rakul Preet Singh Health Update

"मोठी चूक झाली…" पाठीच्या दुखापतीनंतर रकुल प्रीतची आहे अशी अवस्था, म्हणाली, "बरी होईल वाटलं पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.