Rakul Preet Singh Health Update : रकुल प्रीत सिंग हा बॉलिवूडचा प्रसिद्ध चेहरा आहे. तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये तिने अजय देवगण, अमिताभ बच्चन, सिद्धार्थ मल्होत्रा यांसारख्या बड्या स्टार्सबरोबर काम केले आहे. ही अभिनेत्री तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. मात्र, अलीकडेच रकुलला जिममध्ये जाताना पाठीला दुखापत झाली. आता अभिनेत्रीने तिचे आरोग्याबाबत अपडेट दिली आहे. फिटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या रकुल प्रीत सिंगला अलीकडेच जिममध्ये बॅक बेल्टशिवाय ८० किलो वजन उचलताना पाठीला दुखापत झाली होती. अभिनेत्री गेल्या काही काळापासून बेड रेस्टवर होती आणि तिला बरे होण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल असे दिसतेय. रकुलने नुकतेच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना तिच्या आरोग्याचे अपडेट देखील दिले.
‘दे दे प्यार दे’ फेम अभिनेत्री रकुल म्हणाली की, “मी आता बरी आहे पण पाठीची दुखापत बरी होण्यास वेळ लागतोय”. रकुलने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशनचे आयोजन केले होते. यादरम्यान एका यूजरने तिला विचारले की, “अलीकडे मला तुमच्या तब्येतीची काळजी वाटत आहे मॅडम, आता तुमची तब्येत कशी आहे?”. चाहत्याच्या या प्रश्नाला प्रत्युत्तर देत रकुलने एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये ती म्हणाली, “खूप खूप धन्यवाद, मी आता खूप बरी आहे. पण पाठीच्या दुखापती बऱ्या व्हायला वेळ लागतो. हे एका वेळी एक दिवस आहे, दररोज चांगले होत आहे त्यामुळे दररोज प्रगती होत आहे. माझे पुष्कळ पुनर्वसन चालू आहे, परंतु मी एकच म्हणेन की कृपया स्वतःला कधीही त्या मर्यादेपर्यंत ढकलू नका की तुम्ही तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष कराल. मी सर्वात मोठी चूक केली ती म्हणजे धक्का देणे”.
आणखी वाचा – “मला तिच्या रुपात मुलगीच झाली अन्…”, मृणाल कुलकर्णींनी सांगितलं सूनेबरोबरचं नातं, म्हणाल्या, “देवाने थेट…”
ती पुढे म्हणाली, “मी आता बरे होण्याच्या आठव्या आठवड्यात आहे आणि जेव्हा दुखापत झाली तेव्हा मला वाटले की मी एक ते दोन आठवड्यांत बरी होईल पण त्यासाठी वेळ लागतो. तुमचे शरीर तुमच्यासाठी करत असलेल्या सामान्य गोष्टींसाठी नेहमी कृतज्ञ रहा, जसे की कारमध्ये बसणे आणि काळजी घेणे किंवा फक्त निष्क्रिय राहणे. आता मी बरी आहे, तुमचे खूप खूप आभार आणि मी लवकरच बरी होईन”.
याशिवाय, एएमए सत्रादरम्यान, रकुलने तिच्या आगामी विनोदी शैलीच्या ‘दे दे प्यार दे २’ बद्दल देखील बोलली. एका चाहत्याला उत्तर देताना ती म्हणाली, “तुम्हा सर्वांना तो चित्रपट पाहताना किती मजा येईल याची मी वाट पाहू शकत नाही. पुढच्या वर्षी हा चित्रपट लवकरच येत आहे”. अभिनेता आर माधवन आगामी सिक्वेलमध्ये रकुल प्रीत सिंगच्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. ज्यामध्ये त्याचे पात्र आणि अजय देवगणचे पात्र आशिष यांच्यात एक मजेदार संबंध जोडले जाणार आहेत. सध्या चाहते रकुलच्या ‘दे दे प्यार दे 2’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत.