शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जहांगीर नावाची जहागिरी नक्की कुणाकडे?

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 23, 2024 | 5:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chinmay Mandlekar trolled for his son’s name jahangir

जहांगीर नावाची जहागिरी नक्की कुणाकडे?

शेक्सपिअरने सांगितलंय की नावात काय आहे? हे वाक्य सहज कोणाच्या ना कोणाच्या तोंडी आपण फार आधीपासूनच ऐकत आलो आहोत. आज अचानक या वाक्याची आठवण झाली ती अभिनेता, लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरमुळे. चिन्मयने त्याच्या लेकाचं नाव ‘जहांगीर’ ठेवलं. बरं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न. त्याने त्याच्या खासगी आयुष्यात काय करावं आणि काय करु नये हे सांगणारे आपण कोणीच नाही. किंबहूना त्याच्या आयुष्यामध्ये डोकावून पाहण्याचा अधिकारही कोणाला नाही. पण मुलाच्या नावावरुन त्याला व त्याच्या कुटुंबियांना अनेकांनी नको नको ते सुनावलं. चिन्मय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकरत नसता तर तुम्ही शांत बसला असता का? असाही प्रश्न उभा राहतो.

प्रेक्षक आहात म्हणून कलाकारांनी तुम्हाला सगळे अधिकार दिलेले नाहीत. जर तुमच्या नावावरुन कलाकारांनी तुम्हाला डिवचलं तर चालेल का? नाही ना! मग हाही अधिकार कुणालाही दिलेला नाही. आपल्याकडे अनेक नावं आहेत. बॉलिवूडचे आघाडीचे संगीतकार ए. आर. रहमान हे पूर्वीचे ए. एस. दिलीपकुमार. भलेही त्यांनी त्यांच्या मर्जीनुसार वेगळा धर्म स्वीकारला असेल. पण आज इतकी वर्षे बॉलिवूडची गाणी करूनही एकही वाक्य ते हिंदीत कधीच बोलले नाहीत, बोलतही नाहीत. मग त्यांना कधीच कोणी जाब विचारत नाही.

View this post on Instagram

A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar)

आणखी वाचा – “यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही”, मुलांच्या नावावरुन ट्रोल करताच चिन्मय मांडलेकर स्पष्टच बोलला, म्हणाला, “माझ्या कुटुंबाला आणि…”

महाराष्ट्रातही जहांगीर आर्ट गॅलरी आहेच ना… त्या आर्ट गॅलरीमध्ये हेच ट्रोलर्स डोळे अगदी मोठे करुन जातात.  सागरिका घाटगेने तर झहीर खानबरोबर लग्न केलं. दुसरीकडे शिबानी दांडेकर फरहान अख्तरसह संसार थाटू लागली. हा त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण त्यांना कोणीच काही बोललं नाही मग फक्त चिन्मय मांडलेकरच का? 

आणखी वाचा – “घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना…”, मराठी कलाकारांचा चिन्मय मांडलेकरला पाठिंबा व कारवाईची मागणी, म्हणाले, “आम्ही विनंती करतो की…”

आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. ही या मराठी कलाकारासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. जे ट्रोल करत आहेत त्यांनी कॅमेऱ्यासमोर किंवा रंगमंचावर एक वाक्य तरी नीट धड बोलून दाखवावं. पण ते त्यांच्याकडून होणार नाही. कसं आहे ना! की, मागून सगळेच नावं ठेवायला तयार असतात, पण तोंडावर बोलायची कोणाचीही तितकी हिंमत नाही.

आणखी वाचा – “भारत सोडून जायला आम्ही इंग्रज नाही”, मुलाच्या नावावरुन ट्रोल करताच चिन्मय मांडलेकरची पत्नी भडकली, म्हणाली, “हा निर्णय घेण्याचा…”

पुलंनी म्हटलंय ना “आपण कोण, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं.” अगदी तशीच ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. असं असेल तर या ट्रोलर्सविरुद्ध अँटी ट्रोलर्ससुद्धा तयार झाले पाहिजेत. जे या ट्रोलर्सवर अंकुश ठेवतील. कारण कुटुंबाच्या कुटुंब आणि करिअरसुद्धा उध्वस्त करणारे हे ट्रोलर्स एकप्रकारे सोशल मीडियाचे व्हायरसच म्हटले पाहिजेत आणि त्यांना अँटी ट्रोलर्ससारख्या अँटीव्हायरसचीच गरज आहे.

आणखी वाचा – “लोकांची लायकी नाही आणि…”, चिन्मय मांडलेकर प्रकरणावर गौतमी देशपांडे भडकली, म्हणाली, “कलाकाराला असं वागवणं…”

एखाद्या व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण होऊन दबावाखाली कोणतीही व्यक्ती आपलं आयुष्यही संपवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे हाही एकप्रकारे हकनाक गेलेला बळी ठरू शकतो. याला जबाबदार कोण? आणि हे सगळं कुठवर जाईल. ही भविष्यातील भीषण सत्यता आहे. त्यामुळे थांबवा आता हे प्रकरण आणि चिन्मय व चिन्मयच्या कुटुंबियांना सुखाने जगु द्या…

Tags: chinmay mandlekarChinmay Mandlekar Son JahangirChinmay Mandlekar Troll
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Avadhoot Gupte expressed on trolling of Chinmay Mandlekar

"फोन बंद करुन बसलास म्हणून...", चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सोडताच अवधूत गुप्तेची कमेंट, म्हणाला, "निर्णय शहाणपाचा आहे का हे...?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.