अनेक वेगवेगळे विषय घेऊन अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. त्यातील काही चित्रपट प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करतात. असाच एक चित्रपट म्हणजे चंद्रमुखी.चंद्रमुखी या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता होता . तसेच या चित्रपटातील चंद्रा या गाण्याची भुरळ तर आजही चाहत्यांमध्ये दिसते. गेल्या वर्षी २९ एप्रिल रोजी चंद्रमुखी हा ब्लॉगबस्टर चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या. प्रदर्शनाच्या आधीपासूनच हा चित्रपट तुफान चर्चेत होता. तसंच हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याने अनेक रेकॉर्ड्स मोडले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाचे सगळेच शो सर्वत्र हाऊसफुल होत होते.या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं असून त्याच्या दिग्दर्शनाचं कौतुक आजही केलं जात.नुकतंच या चित्रपटाला १ वर्ष पूर्ण झालं यानिमित्त या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी खास पोस्ट केली आहे.(Chandramukhi)
चित्रपटाला १ वर्ष पूर्ण होताच काय म्हणाले कलाकार?
अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी या चित्रपटाच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या आठवणी शेअर करत प्रसाद म्हणाला, “चंद्रमुखी” ला एक वर्ष पूर्ण…!!!
रसिक प्रेक्षक आणि चंद्रमुखीच्या संपूर्ण टीम चे शतशः आभार…!!!,आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना… तर या पोस्टवर या चित्रपटातील बत्ताशा म्हणजे अभिनेता समीर चौघुले यांनी अविस्मरणीय आनंद चंद्रमुखी, तर अमृता म्हणजे चंद्राने Kiti kiti kiti kamal photos …. Kai athavani …. Thankyou so much for this both of you …. असं म्हटलंय.
यासोबतच अभिनेत्री अमृता खानविलकरने,हा प्रवास मी शब्दात मांडू शकत नाही …. #चंद्रा ही सांगता येणारी आणि नसांगता येणारी हे आहे …. मी यावर काय बोलू … पण हो मी तिच्याकडून खूप काही शिकले आणि आजही शिकतेय असं म्हणत.तिने या चित्रपटाच्या संपूर्ण कास्ट आणि प्रेक्षकांचे आभार मानलेत. तर या पोस्टवर देखील अनेक चाहत्यांनी तिच्या भूमिकेचं कौतुक केलं.
हे देखील वाचा : हिंमत दाखवणं हा एकच पर्याय – असा शूट केला गौरीने सिन
हा चित्रपट प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित असून या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार झळकले.(Chandramukhi)
हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या ‘चंद्रा’ची प्रेमकहाणी ‘चंद्रमुखी’ सिनेमात दाखवण्यात आली आहे.
