दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता व निर्माता विशाल त्याच्या ॲक्शनपॅक चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत येतो. पण आता तो एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला, ते म्हणजे सेन्सॉर बोर्डावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप. विशालने सेन्सॉर बोर्डावर आपला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता. तसेच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंतीदेखील केली होती. आता सेन्सॉर बोर्डाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. (CBFC Statement on Vishal’s Accusation)
विशालने ‘X’ वर (पूर्वीचे ट्विटर) एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्याच्या ‘मार्क अँटनी’ चित्रपटाचा हिंदी व्हर्जन प्रदर्शित करण्यासाठी बोर्डाने आपल्याकडून तब्बल ६.५ लाख रुपये मागितले असल्याचे तो म्हणाला. आता त्यावर सेन्सॉर बोर्डाने एक निवेदन प्रसिद्ध करत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
विशालच्या या आरोपांबाबत सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या निवेदनात म्हटलं की, “CBFC मध्ये ऑनलाइन सर्टिफिकेशन सिस्टिम असूनही चित्रपट निर्माते, अर्जदारांसाठी नव्या सिस्टिममधील सुधारणांबद्दल नियमित अपडेट देऊनही ते अजून मध्यस्थ किंवा एजंटच्या माध्यमातून अर्ज करणे पसंत करतात. हे या प्रक्रियेत तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग काढून टाकण्याच्या उद्देशाच्या विरुद्ध आहे. पण तरीही आम्ही हे आरोप अतिशय गांभीर्याने घेतले आहेत. CBFC भ्रष्टाचार अजिबात सहन करत नाही. तसेच, कोणीही यात सहभागी असल्याचे दिसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. CBFC ची प्रतिमा मलीन करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.”
हे देखील वाचा – झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ, म्हणाली,…
“चित्रपट निर्मात्यांना आम्ही विनंती करतोय की, त्यांनी त्यांचे नियोजित करण्यापूर्वीच सर्टिफिकेशनसाठी अर्ज करावा. जेणेकरून त्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळेल. अगदीच तातडीच्या अत्यंत प्रकरणांमध्ये, निर्माते सीबीएफसीच्या उच्च अधिकार्यांकडे वाजवी कारण देऊन लेखी विनंती करू शकतात,” असेही त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
हे देखील वाचा – दुसऱ्यांदा आई-बाबा होणार अनुष्का शर्मा व विराट कोहली?, लवकरच घरी नव्या पाहुण्याचं आगमन
Actor Vishal's allegations on CBFC | CBFC says, "It has been noticed that despite the online certification system i.e. E-Cinepramaan in place and regular updates on new system improvements for the film producers/applicants, they still choose to apply through intermediaries or… pic.twitter.com/kVZchmB9mj
— ANI (@ANI) September 29, 2023
विशालच्या चित्रपटाबाबत बोलायचे झाल्यास, त्याचा ‘मार्क अँटनी’ चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये विशालसह एसजे सूर्या, रितू वर्मा मुख्य भूमिकांमध्ये दिसले आहे.