शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : डोळ्यासमोर दहशतवादी, गोळीबार सुरु तरीही लहान मुलाला घेऊन पळालेला ‘तो’ काश्मीरी मुलगा, साक्षात देवदूत अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 28, 2025 | 4:17 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Pahalgam terror attack viral video

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये काश्मीरी मुलगा ठरला देवदूत, 'तो' व्हिडीओ व्हायरल

मंगळवार २२ एप्रिल संपूर्ण देशासाठीच काळा दिवस ठरला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आणि यावेळी २६ जणांनी आपला जीव गमावला. यामध्ये तरुण पर्यटकांचाही समावेश होता. निसर्गात हरवून गेलेल्या ठिकाणी सुट्टी एन्जॉय करत असताना क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पण या संपूर्ण घटनेमध्ये तेथील काही स्थानिक लोक पर्यटकांसाठी देवमाणूस ठरले. पर्यटकांना मदत करत असताना २० वर्षीय घोडेवाला सय्यद आदिल शाहाचा मृत्यू झाला. गोळीबार करु नका असं तो दहशतवाद्यांना म्हणत असतानाच सय्यदलाच मारण्यात आलं. त्याचं हे धाडस व कतृत्त्वाला सलामाच… सय्यदबरोबरच आणखी एक लहान काश्मीरी मुलगा पर्यटकांसाठी हिरो ठरला. त्याच्याची सध्या चर्चा सुरु आहे. (pahalgam terror attack viral video)

पहलगाम हल्ल्यातील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामधील एक व्हिडीओ माणूसकीचं दर्शन घडवणारा ठरला. एकीकडे माणसातल्या राक्षसांचं दर्शन पर्यटकांना घडत होतं, तर दुसरीकडे माणसातला देव मदतीला धावून येत होता. सोशल मीडियायावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक काश्मीरी मुलगा लहान मुलाला उचलून धावत येताना दिसत आहे. तसेच गोळीबाराचा आवाजही यामध्ये येत आहे.

आणखी वाचा – मॅगी खाताना नवऱ्याला मारलं, ते पाहून पत्नीने दहशतवाद्यांकडे मरण मागितलं अन्…; पहलगाममध्ये नववधूने फोडला टाहो

पाहा व्हिडीओ

A Kashmiri boy carried a tourists small baby in his Arms and saved him during the Phalgam attack. But no media will show it .#PahalgamTerrorAttack pic.twitter.com/Y58VuV5UhU

— 🎀🎀. (@Kaakazkyom) April 25, 2025

गोळीबार सुरु असताना काश्मीरी मुलाने लहान बाळाला उचलून घेत एकच वाट धरली. गोळीबाराचा आवाज वाढला तसा त्याचा धावण्याचा वेगही वाढत होता. इतर काही पर्यटक व्हिडीओमध्ये घोड्याने डोंगर उतरताना दिसत आहेत. तर काही महिला जीव वाचवण्याच्या हेतून ओरडत आहेत. ही भयंकर घटना व्हिडीओमध्ये पाहूनच अंगावर काटा येतो. मात्र काश्मीरी मुलाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलेलं काम खरंच कौतुकास्पद आहे. सोशल मीडियाद्वारे हा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरातून त्याचं कौतुक होत आहे.

आणखी वाचा – नवरा रक्ताच्या थारोळ्यात, मुलांना वाचवण्यासाठी बुरखा घातला, नदी ओलांडताना…; पहलगाम हल्ल्यात आईचा लेकांच्या जीवासाठी संघर्ष

पहलगाम हल्लाचे जे साक्षीदार होते त्यांनी तिथल्या घटनेची संपूर्ण परिस्थिती सांगितली. धर्म विचारुन केलेला गोळीबार, फक्त पुरुषांनाच टार्गेट या सगळ्या गोष्टी यामधून समोर आल्या. इतकंच नव्हे तर काश्मीरच्या वाढत्या पर्यटनामुळे हा हल्ला झाला असावा असा अंदाजही वर्तवला जात आहे. कारण काहीही असो मात्र अशापद्धतीने निष्पाप लोकांना जागीच ठार करणं आयुष्यभरासाठी जखम देणारं आहे. या राक्षसांना योग्य ती शिक्षा कधी मिळणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

Tags: trending newstrending video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Drinking Water in Plastic Bottles

प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी पिणं कितपत योग्य?, तुम्हीही याचा वापर करत असाल तर काय होतं?, जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.