मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या कामाचा दबदबा असणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच ती मात्र तिच्या नृत्याचेही लाखो चाहते आहेत. आजही अमृताच्या चंद्रा या गाण्याची भुरळ प्रेक्षकांमध्ये आहे. चंद्रा या गाण्यामुळे अमृताला सम्पूर्ण जगभरात ओळख मिळाली आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. लावणी नृत्यांगना म्हणून अमृताचा हातखंडा असला तरी कथक नृत्याची ती चाहती आहे. (Amruta Khanvilkar)
नुकतच तिनं नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये पहिल्यांदाच कथक नृत्य सादरीकरण केलं. येथील ‘राम रतन धन’ कार्यक्रमात अमृतानं कथक नृत्य सादर करताना तिथल्या अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे. अतिशय अविस्मरणीय अनुभव मला या दरम्यान आला आहे. मी आतापर्यंत केलेल्या इतक्या नृत्य सादरीकरणापेक्षा हा अनुभव खूप वेगळा होता.
पाहा का दिली नव्हती अमृताला परवानगी (Amruta Khanvilkar)
कलेवर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांसमोर कथक नृत्य सादर करणं म्हणजे एक सुंदर अनुभव होता आणि माझ्यासाठी एक पर्वणीच.’ बरं पण अमृताने अद्याप कथक नृत्याचे कोणतेही धडे घेतलेले नाहीत. असं असलं तर अमृताचं आणि कथकच घट्ट नातं आहे. याबाबत अमृताने एक खुलासा केला आहे. अमृताच्या कथक शिकण्याला तिच्या आयुष्यातल्या महत्वाच्या व्यक्तीचा विरोध होता हे अमृताने सांगितलंय.
काही जुन्या आठवणींना उजाळा देत अमृता म्हणाली की, ‘माझ्या बहिणीचं कथक सादरीकरणाचा कार्यक्रम मी बघायला गेले होते आणि मलाही कथक शिकायच आहे अशी इच्छा मी माझ्या घरी व्यक्त केली; पण त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यासाठी परवानगी दिली नाही. पुढे मनोरंजनविश्वात काम करताना मी अनेक नृत्य सादर केले; पण कथक फारसं कधी केलं नाही. आता कथक नृत्याचा वारसा आणि परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. त्या दिशेनं पावलं टाकायला मी सुरुवात केली आहे’.
हे देखील वाचा – “ज्या पुलावर फोटो काढले,तोच वाहून गेला”पूरस्थितीवर स्वातीने सोडलं मौन
अमृता एक उत्तम नृत्यांगना आहे यांत वादच नाही. अभिनयसृष्टीत आता जम बसवलेल्या अमृताने आपली पावलं कथक नृत्याकडे वळविली आहेत.
