श्रावण महिना सुरु होताच आता सणांना सुरुवात झाली आहे. काही दिवसांवर गणेशोत्सव आला असून गणेशोत्सवाची लगबग आतापासून सुरु झालेली पाहायला मिळत आहे. खासकरुन कोकणात गणेशोत्सव हा दणक्यात साजरा केला जातो. प्रत्येकजण वेळात वेळ काढत गणेशोत्सवाला जात हजेरी लावताना दिसतो. गणपती बाप्पांची मूर्ती रंगवण्याचे कामही गणेश शाळेत जोरदार सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. अशातच एका अभिनेत्याने गणेश मूर्तींना घडवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हा अभिनेता एकटा नसून त्याच्या मुलांसह दिसत आहे. हा अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर. (Abhijeet Kelkar Video)
‘बिग बॉस’मराठीमुळे अभिनेता अभिजीत केळकर चर्चेत आला. अनेक मालिका, चित्रपट, नाटक यांमधून अभिजीतने महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र अभिजीतला ‘बिग बॉस’ मराठीमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही अभिजीत बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अभिजीत विशेषतः त्याच्या घरातल्यांना वेळ देताना दिसतो. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत तो अपडेट देत असतो.
अशातच अभिजीतने त्याच्या दोन्ही मुलांना गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून देत. गणपती बाप्पांच्या मूर्तीला घडवताना आणि रंग देताना त्याची दोन्ही मुलं दिसत आहेत. हा अनुभव त्याच्या दोन्ही मुलांनी घेतला असून दोघेही खूप खुश दिसले. अभिजीत त्याच्या दोन्ही मुलांना घेऊन डोंबिवली येथील गणपती घडवण्याच्या व रंगवण्याचा वर्कशॉपला घेऊन आला होता. आपल्या मुलांना याचाही अनुभव घेता यावा म्हणून अभिजीतने हे ही संधी त्यांना दिली.
व्हिडीओमध्ये पाहायला गेलं तर अभिजीतची दोन्ही मुलं त्यांचा हा अनुभव सांगताना दिसली. यावेळी दोघांनी हे काम आवडीने व खूप काळजीपूर्वक केलं असल्याचं म्हटलं. हा अनुभव त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. अभिजीतची दोन्ही मुलं मनापासून गणपती बाप्पांना रंगवताना दिसत आहेत. अभिजीत हा मूळचा कोकणातील आहे. त्यामुळे त्याला कोकणाचीही आवड आहे. कोकणातल्या गावी तो बरेचदा जाताना दिसतो आणि तेथील फोटो, व्हिडीओ शेअर करतो.