Aishwarya Rai On Rumours : बी-टाऊनमध्ये सलमान खान व ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची खूप चर्चा होती. सलमान व ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले असले तरी हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात होते. त्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले आणि संसार थाटला. या जोडप्याला आराध्या बच्चन ही एक मुलगी आहे. तर एकीकडे सलमान अजूनही सिंगल लाइफ एन्जॉय करत आहे. दरम्यान एकदा सलमान व ऐश्वर्याच्या गुपचूप लग्न केल्याच्या अफवा पसरल्या होत्या, त्यावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली होती. इंडस्ट्रीत सलमान खान व ऐश्वर्या राय यांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा होती. दोन्ही बाजूंनी याबाबत कोणतीही पुष्टी झाली नसली तरी, हे लग्न झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे. लोणावळ्यातील एका बंगल्यात झालेल्या या लग्न सोहळ्याचे संचालन मुंबईतील एका काझी यांनी केले. लग्नासाठी ऐश्वर्याने इस्लाम धर्म स्वीकारल्याची अफवा पसरली होती, ज्याला तिच्या जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती.
सलमान व ऐशचे आई-वडील मात्र या लग्नाला उपस्थित नव्हते, असेही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. यानंतर अशा अफवा देखील पसरल्या की लग्नानंतर हे जोडपे त्यांच्या हनीमूनसाठी न्यूयॉर्कला गेले होते आणि मुंबईला परतताना ते एकत्र स्पॉटही झाले. अर्थात हे नाकारता येऊ शकत नाही की, ऐश्वर्याचे आई-वडील नेहमीच त्यांच्या मुलीचं सलमान खानबरोबर लग्न लावून देण्याच्या विरोधात होते आणि अफवांमुळे त्यांचा त्रास वाढला होता. याशिवाय ऐश्वर्या राय स्टारर चित्रपटांच्या निर्मात्यांना तिच्या लग्नाची बातमी कानावर येताच त्यांनादेखील चित्रपटाच्या भविष्याची चिंता वाटू लागली.
ऐश्वर्या राय व सलमान खानच्या गुपचूप लग्नाच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरत असताना, अभिनेत्रीने शांतपणे हे सर्व प्रकरण फेटाळून लावले. मीडिया संवादादरम्यान, ऐशने ते सर्व वृत्त फेटाळून लावले आणि असं म्हटलं की, “जर हे घडले असते तर संपूर्ण इंडस्ट्रीला याची जाणीव झाली नसती का? इंडस्ट्री ही फार लहान आहे. शिवाय माझ्या आईच्या अपघातानंतर मला माझ्या कुटुंबीयांबरोबर एकत्र वेळही घालवता आला नाही. मी त्या लोकांपैकी नाही आहे ज्यांनी माझ्या लग्नाची घोषणा जगासमोर केली. असं असत तर मीच अभिमानाने हे लग्न झाल्याचं सर्वांसमोर सांगितलं असतं. पण तरीही, लग्न करायला वेळ कुठे आहे?”.
दोघांचे ब्रेकअप झाल्यावर सलमान व ऐश्वर्याच्या लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या चाहत्यांना धक्काच बसला. ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्याने तिच्या नात्यातील समस्यांबद्दल सांगितले होते आणि सलमानबरोबर राहताना तिला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले तेदेखील सांगितले. तिने नमूद केले की, “तिच्या सर्वात वाईट वेळी तिने सलमानच्या मद्यपी गैरवर्तनाचा सामना केला आणि शाब्दिक, शारीरिक व भावनिक अत्याचार, अपमानही सहन केला. त्यामुळे तिने त्याच्याबरोबरचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता”.