बॉलिवूडमधील निर्माती, दिग्दर्शिका व नृत्यदिग्दर्शिका फराह खान सध्या खूप चर्चेत आहे. आजवर फराहने अनेक दमदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच सोशल मीडियावरदेखील फारह मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली बघायला मिळते. सध्या ती तिच्या व्लॉगिंगमुळे खूप चर्चेत आली आहे. युट्यूबवर तिचे खूप व्लॉग बघायला मिळतात. फराह अनेक कलाकारांच्या घरी जाते आणि त्यांच्या किचनमध्ये जाऊन जेवण बनवण्याचे व्हिडीओ ती पोस्ट करत असते. हे सगळेच व्हिडीओ खूपच मजेशीर असतात. अशातच ती आता तिचा खास मित्र व चित्रपट निर्माता करण जोहरच्या घरी पोहोचली. यावेळी त्यांनी चॉकलेट फजची रेसिपी ट्राय करताना दिसत आहेत. तसेच यामध्ये असं काही दिसलं ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. (karan johar bathroom)
व्हिडीओच्या सुरुवातीला फराह करणच्या घरी पोहोचलेली दिसून येत आहे. त्याच्या घरामध्येच त्याचं ऑफिसदेखील आहे. यावेळी तिने करणच्या घराची झलकदेखील दाखवली. घरातील हॉल, किचन, बेडरुम, लिव्ह इन रुम असं सगळं काही दिसून येतं. मात्र व्हिडीओतील एका ठिकाणी सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. करणच्या घरातील पाहुण्यांसाठी असलेल्या बाथरुमकडे सगळ्यांच्याच नजरा खिळल्या. हे बाथरुम उच्च दर्जाच्या पितळेने बनलेले असल्याचे करणने सांगितले.
हे बाथरुम खूपच अलिशान असून यामध्ये संपूर्ण काम हे पितळेचे असलेले दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये फराह म्हणते की, “मी स्वतःला किती गरीब समजू?”. दरम्यान यावेळी फराह व करणच्या सगळ्या जुन्या आठवणी ते सांगताना दिसतात. या बाथरुममध्ये पितळेचे डब्बे ठेवलेले दिसत आहेत. मात्र हे डब्बे केवळ सजावटीसाठी असल्याचे करण फराहला सांगतो.
याचवेळी करण फराहचीदेखील बॅग उघडतो आणि तिच्या बॅगमध्ये काय आहे? हे दर्शकांना सांगताना दिसतो. करणला फराहच्या बॅगमध्ये ५०० रुपयांची नोट मिळते. त्यावर करण म्हणतो की हे पैसे शगुनचे आहेत. त्यावर फराह करणला मस्करीमध्ये “सदा सौभाग्यवती भव”, असा आशीर्वाद देते. नंतर लगेचच करण म्हणतो की, “फराह माझ्या हातांना हळद कधी लागणार?”, त्यावर फराह म्हणते की, “आधी चॉकलेट फज तयार करुया मग तुझ्या हळदीचं बघूया”. दरम्यान फराहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.