Usha Nadkarni family news : बरीच अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. पण आलेल्या सगळ्या अडचणी पार करत या कलाकारांनी सिनेविश्वात स्वतःच नाव निर्माण केलं. यामध्ये एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेता येईल ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी. गेली अनेक वर्ष उषा यांनी त्यांच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये उषा यांनी स्वतःच स्थान निर्माण केलं. मराठीसह हिंदीतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. आज उषा यांचा सिनेविश्वातील प्रवास नावाजलेला असला तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच अडचणींनी भरलेले पाहायला मिळाले.
उषा यांनी पवित्र रिश्ता सारख्या मालिकेत कठोर शिस्तीच्या आईची भूमिका सांभाळली. अशातच त्यांनी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टवर उषा यांनी त्यांच्या पालकांबाबत भाष्य केलं. उषा यांचे वडील वायुसेनेत अधिकारी पदावर कार्यरत होते आणि त्यांची आई शिक्षिका होती. या मुलाखतीदरम्यान त्या म्हणाल्या, “जर त्यांना वर्तमानपत्र खराब झालेले किंवा वाकडे आढळले, तर ते रागावून ते फाडून टाकायचे. जर त्यांना दिसले की, आमच्या शाळेची पुस्तके व्यवस्थित रांगेत ठेवलेली नाहीत तर ते ती रागाने फाडून टाकायचे. माझी आई त्यांना सांगायची की, त्यांना नवीन खरेदी करावी लागतील म्हणून त्यांनी ती फाडू नयेत”.
उषा नाडकर्णी पुढे म्हणाल्या, “तो खूप हिंसक माणूस होता. आम्हाला त्यांची भीती वाटत असे. आमच्यापैकी एकाला मारहाण व्हायची आणि बाकीचे दोघे पळून जायचे. एकदा, माझ्या भावाला काही कारणास्तव मारहाण होत होती आणि मी त्यांना थांब माझ्यावरदेखील कोयत्यानं हल्ला केला होता. माझ्या हाताला दुखापत झाली होती आणि दुसऱ्या दिवशी माझं एक नाटक होतं. मी दुखापतीसह सादरीकरणासाठी गेले होते.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, त्यांचे वडील एकदा त्यांच्या भावाला बेशुद्ध होईपर्यंत मारत होते”.
आणखी वाचा – ऐश्वर्या नारकर, तितीक्षा आणि सुरुची…; मराठी अभिनेत्रींनी एकत्र येत सुरु केला नवा व्यवसाय, ब्रँडचं नाव आहे…
उषा यांनी यापूर्वी सांगितलेल्या मुलाखतीत असं म्हटलं होत की, त्यांचं अभिनयविश्वात काम करणं त्यांच्या आई-वडिलांना मान्य नव्हतं. अभिनयाला उषा याच्या घरातून विरोध असल्याचं पाहायला मिळालं. उषा यांनी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या घरी अभिनयात करिअर करण्याबाबत सांगितलं तेव्हा त्यांच्या आईने त्यांना अगदी त्यांच्या कपड्यांसह घरातून बाहेर फेकलं.





