Rajpal Yadav Father Death : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादववर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या वडिलांचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे. राजपालला दोनच दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या काळजीत असतानाच अभिनेत्याच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीने दुःखाची पोकळी निर्माण झाली आहे. राजपाल यादव यांचे वडील नौरंग यादव हे काही काळ आजारी होते. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजपाल यादव थायलंडमध्ये होता. जेव्हा त्याला आपल्या वडिलांच्या तब्येतीबद्दल माहिती मिळाली तेव्हा तो ताबडतोब थायलंडहून दिल्लीला आला.
वडील रुग्णालयातून बरे होऊन घरी येतील, अशी राजपाल यादवला आशा होती. मात्र रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला. राजपाल यादवच्या वडिलांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर राजपाल यादव यांच्या वडिलांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी शाहजहांपूर येथे होणार आहेत. अद्याप या संदर्भात अभिनेत्याने कोणतीही माहिती दिलेली नाही.
आणखी वाचा – ‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार, थाटात पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल
राजपाल यादव यांच्यासह तीन कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्याला पाकिस्तानकडून धमकीचा ईमेल आला होता. मेलमध्ये लिहिले होते, “आम्ही तुमच्या अलीकडील कृतींवर नजर ठेवत आहोत. आम्हाला विश्वास आहे की आम्ही एक संवेदनशील बाब तुमच्या लक्षात आणून देणे महत्त्वाचे आहे. हा सार्वजनिक स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही. आम्ही तुम्हाला विनंती करतो की हा संदेश अतिशय गांभीर्याने घ्या आणि गोपनीयता राखा”.
मेलमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘जर मेल करणाऱ्यांचे म्हणणे मान्य केले नाही तर राजपाल यादवला धोकादायक परिणामांना सामोरे जावे लागेल. मेल करणाऱ्याकडून अभिनेत्याकडून आठ तासांत उत्तर मागितले होते’. मेलमध्ये लिहिले होते, “जर तुम्ही असे केले नाही तर त्याचे परिणाम धोकादायक असू शकतात ज्याचा तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. आम्ही पुढील आठ तासांत तुमच्याकडून त्वरित प्रतिसादाची अपेक्षा करतो. आम्हाला प्रतिसाद न मिळाल्यास, तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचे आम्ही गृहीत धरु आणि आवश्यक ती कारवाई करु. विष्णू”. मेल मिळाल्यानंतर राजपाल यादव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.