बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात चार आरोपींना अटक, एक हल्लेखोर गोळीबार करताना दिसला; CCTV फुटेज समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 2, 2026 | 12:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rohit Shetty Firing Case Update

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात चार आरोपींना अटक, एक हल्लेखोर गोळीबार करताना दिसला; CCTV फुटेज समोर

Rohit Shetty Firing Case Update : रविवारी, १ फेब्रुवारी रोजी दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या गोळीबारप्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणात आता चार जणांना अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य आणि राष्ट्रवादीचा नेता बाबा सिद्दीकी खून प्रकरणातील आरोपी शुभम लोणकर याच्याशी हे लोक संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चौघांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांमध्ये त्याचा समावेश आहे. या सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच वेळी, सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे, ज्यामध्ये हल्लेखोर गोळीबार करताना आणि दुचाकीवरुन जाताना दिसत आहे. याशिवाय रोहित शेट्टीनेही आपले म्हणणे नोंदवले आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. याप्रकरणी चार तरुणांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य एकाची चौकशी सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना रविवारी मुंबईच्या एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये आदित्य ज्ञानेश्वर गायकी (वय १९ वर्षे), सिद्धार्थ दीपक येनपुरे (वय २० वर्षे), समर्थ शिवशरण पोमाजी (वय १८ वर्षे), स्वप्नील बंडू सकट (वय २३ वर्षे) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे. तपासाचा भाग म्हणून रोहित शेट्टीचा जबाब नोंदवण्यात आला आहे, जेणेकरुन घटनेच्या तळापर्यंत पोहोचता येईल.

आणखी वाचा – “आमचं रिलेशनशिपच टॉक्सिक झालं”, प्रियदर्शिनी इंदलकर रिलेशनबाबत स्पष्टच बोलली, म्हणाली, “लवकर लग्न…”

firing CCtv footage at Rohit Shetty’s House. See on the left hand side of d video #rohitshetty pic.twitter.com/9P4GZNcB4K— Preeti Sompura (@sompura_preeti) February 1, 2026

या प्रकरणाच्या तपासासाठी १२ हून अधिक पथके तैनात करण्यात आली असून, ते वेगवेगळ्या कोनातून घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी परिसरात लावलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. ज्यामध्ये एक मोटर बाईक दिसलीआहे. आणि दुसऱ्या भागात एक हल्लेखोर पाच राऊंड गोळीबार करताना दिसतो. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे. तपासाचा भाग म्हणून रोहित शेट्टीचा जबाब नोंदवण्यात आला आहे, एक मोटर बाईक दिसला आहे. आणि दुसऱ्या भागात एक हल्लेखोर पाच राऊंड गोळीबार करताना दिसतो.

आणखी वाचा – “मी सदस्यांशी जुळवून…”, सोनाली राऊतची घरातून एक्झिट, बाहेर पडताच म्हणाली, “माझ्याकडून खूप अपेक्षा…”

वरळीतील रोहित शेट्टीच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हे शाखेने तत्काळ तपास सुरु केला आणि सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक गुप्तचर आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने पुणे कनेक्शन मिळवले. तपासादरम्यान पुण्यातून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले, त्यापैकी चार जणांना रीतसर अटक करण्यात आली. पाचव्या व्यक्तीची अद्याप सखोल चौकशी सुरु असून, तो या घटनेतील मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता पोलिसांना आहे. सध्या या आरोपींना मुंबईत आणण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags: bollywood newsrohit shettyRohit Shetty Firing Case
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Bigg Boss Marathi 6

"मला हा शो सोडायचा आहे", 'बिग बॉस'च्या घरात तन्वीवर आरोप, सदस्यांनी एकत्र येत टार्गेट केलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.