Kartik Aaryan Gets His Engineering Degree : अभिनेता कार्तिक आर्यनची गणना आज बॉलीवूडमधील टॉप कलाकारांमध्ये केली जाते, पण तो हे स्थान मिळवू शकेल असे त्याला स्वतःला कधीच वाटले नव्हते. अभिनेता होण्यापूर्वी कार्तिक आर्यन इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता पण इंजिनियर होण्याऐवजी तो चित्रपटसृष्टीत आला. आता कार्तिकला जेव्हा १० वर्षांनी इंजिनीअरिंगची पदवी मिळाली तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही आहे. अभिनेता नुकताच मुंबईच्या डीवाय पाटील विद्यापीठात गेला, जिथे त्याचा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी अभिनेत्याचे भरपूर कौतुक आणि सन्मान करण्यात आला.
कार्तिक आर्यनला तब्बल १० वर्षांनंतर अभियांत्रिकीची पदवी मिळाली, ज्याचा व्हिडीओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिकच्या चेहऱ्यावर इंजिनिअर झाल्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे. त्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून अनेक कमेंटचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओ शेअर करताना कार्तिकने लिहिले की, “कॉलेजमध्ये मी मागच्या बेंचवर बसायचो. मी बॅकबेंचर होतो आणि आज मी दीक्षांत समारंभात मंचावर उभा आहे. मी किती आश्चर्यकारक प्रवास केला आहे. कॉलेजने मला खूप सुंदर आठवणी दिल्या, स्वप्ने दिलीस आणि आता शेवटी मला माझी पदवी मिळाली आहे. मला ही पदवी १० वर्षांनी मिळाली”.
कार्तिकने पोस्टमध्ये सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे आभार मानले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कार्तिकला दिलेल्या प्रेमाने त्याचे मन प्रसन्न झाले आणि घरी आल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. कार्तिक आर्यननेही विद्यार्थ्यांबरोबर डान्स केला. कार्तिक आर्यनच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत.
आणखी वाचा – शाहरुख-सलमानच्या सुरक्षा रक्षकांचा नेमका पगार किती?, ‘त्या’ व्यक्तीकडून मोठा खुलासा, म्हणाला, “१.२ कोटी…”
कार्तिकच्या व्यावसायिक कामाबद्दल बोलायचे तर कार्तिक आर्यन २०२४ साली ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटामध्ये दिसला होता, हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता बातमी आहे की तो अनुराग बासूच्या नव्या चित्रपटात सारा अली खानबरोबर दिसणार आहे. हा एक रोमँटिक ड्रामा असेल. मात्र, अद्याप चित्रपट किंवा कलाकारांची घोषणा करण्यात आलेली नाही.