Govinda Latest News : बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच तो एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर त्याच्या गाण्यावर नाचताना दिसला होता, त्यानंतर लोक म्हणू लागले की त्याच्यावर इतके वाईट दिवस आले आहेत. यानंतर आता अभिनेता उत्तर प्रदेशात एका सामान्य कारमध्ये बसताना दिसला. त्यावर ‘Government of India’ असे लिहिले होते. मात्र यामुळे त्याच्या यशाची घसरण दिसून येत असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. एकेकाळी मर्सिडीज, बीएमडब्ल्यू सारख्या आलिशान वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्या ‘चिची’ला आज लोकल कॅबने फिरताना पाहून त्याची लोकांना कीव येत आहे.
हे ज्ञात आहे की १९९० ते २००० च्या दशकात गोविंदाचा दबदबा होता. त्याच्या चित्रपटांनी थिएटरवर राज्य केले. ते पहिल्या क्रमांकाच्या अभिनेत्यांपैकी एक होते. पण कालांतराने त्याला मुख्य चित्रपट मिळण्याची शक्यता कमी झाली. गेल्या अनेक वर्षांपासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही ज्याने आपली छाप सोडली असेल. आता ६२ वर्षीय अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो यूपीमध्ये हुंडई ऑरा टॅक्सीमध्ये बसलेला दिसत आहे. या टॅक्सीवर भारत सरकार लिहिलेले आहे. तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता की अन्य व्यावसायिक कामासाठी की कोणत्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याला सामान्य कारमधून प्रवास करताना पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आणखी वाचा – ‘चारचौघी’ नाटकानंतर माय-लेकीची जोडी ‘माया’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर, दोघींचाही कुल अंदाज भावला आणि…
गोविंदा का डाउनफॉल आज नहीं 2007 से ही शुरू हो गया था। गोविंदा की आखिरी बड़ी फिल्म 2007 में आई ‘पार्टनर’ थी। गोविंदा यहां लीड रोल में नहीं, बल्कि सहायक भूमिका में थे। हालांकि गोविंदा ही पूरी फिल्म की जान थे।
लेकिन पार्टनर के बाद गोविंदा के नखरे फिर बढ़े। डेविड धवन और सलमान खान ने…— AMIT SINGH CHAUHAN (@ARAVUkd) January 29, 2026
यापूर्वी तो मर्सिडीज, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्यांमध्ये प्रवास करत असे. लोक याला गोविंदाचा ‘पतन’ म्हणत आहेत. एका नेटिझनने ट्विट केले की, “एवढ्या मोठ्या स्टारची इतकी मोठी पडझड कशी होऊ शकते? गोविंदा कुठेतरी जात आहे आणि ऑरा गाडी त्याला घ्यायला आली आहे. हा माणूस कधीही मर्सिडीज, ऑडी आणि बीएमडब्ल्यू शिवाय जात नव्हता आणि आज सामान्य ऑरा टॅक्सीतून प्रवास करत आहे”.. दुसरा म्हणाला, “जो गोविंदा कधीही मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूच्या गाड्यांमध्ये बसत नव्हता, तोच आता यूपीमध्ये स्वस्त कारमध्ये बसून स्टेज शो, ऑर्केस्ट्रा, लग्न आणि वाढदिवसांमध्ये नाचतोय. आता ते पंचायत निवडणुकीत गावप्रमुख आणि बीडीसी सदस्यांसाठीही प्रचार करणार आहेत”. पण काही चाहते त्याचा बचावही करत आहेत. एकजण म्हणाला, “काही नाही, सगळ्यांची वेळ पुन्हा येईल”.
आणखी वाचा – “तुला शिव्या देण्याची सवय आहे”, अनुश्री-प्राजक्तामध्ये पेटला वाद; प्रोमोमधील कॅट फाईट पाहून चाहते उत्सुक
गेल्या वर्षी गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाची बरीच चर्चा झाली होती. त्याचे एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याची चर्चा होती. नुकतेच सुनीताने पुन्हा गोविंदाची खरडपट्टी काढली. तिने त्याला ‘शुगर डॅडी’ म्हटले आणि या वयात हे योग्य नसल्याचे सांगितले. ती म्हणाली की, “आजकालच्या मुली अशा श्रीमंत माणसाचा शोध घेतात जो त्यांची काळजी घेईल आणि त्यांच्यावर पैसे खर्च करु शकेल. पण ६० वर्षाच्या माणसाला तो काय करतोय हे समजले पाहिजे”.





