Eijaz Khan Reaction Pavitra Punia : पवित्रा पुनिया आणि एजाज खान वेगळे झाले असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. ‘बिग बॉस १४’ पासून सुरु झालेल्या त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले. ज्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने नाते तुटण्याचे कारण सांगितले, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. यावेळी अभिनेत्रीने धार्मिक धर्मांतराबद्दलही भाष्य केले आहे, ज्यावर एजाजने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा लोक करु लागले आहेत. पवित्राच्या मोठ्या विधानानंतर मात्र आता एजाजच्या प्रवक्त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. एजाजच्या वतीने त्याच्या जवळच्या व्यक्तीने पवित्रा पुनिया हिने केलेलं वक्तव्य खोडून काढलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्येही नक्की खरं कोण बोलत आहे याबाबत चर्चा रंगली आहे.
पवित्रा पुनियाने ‘टेली मसाला’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिने एजाजला आधीच सांगितले होते की ती इस्लाम स्वीकारणार नाही. आता एजाजच्या प्रवक्त्याने अभिनेत्याच्या वतीने म्हटले आहे की, “अभिनेत्रीच्या वक्तव्याचा एजाजच्या कुटुंबावर खोलवर परिणाम झाला आहे कारण त्यांच्या नात्यात धर्माचा मुद्दा कधीच नव्हता”. एजाजच्या प्रवक्त्याने खुलासा केला की, अभिनेत्याच्या वडिलांना त्याच्या मित्रांकडून फोन येत आहेत की, त्यांच्या मुलाने आपल्या मैत्रिणीला इस्लाम स्वीकारण्यास सांगितले आहे का?”.
यापुढे त्यांनी असंही म्हटलं की, “एजाजचे वडील हे प्रकरण ऐकून खूप दु:खी आहेत कारण जेव्हा त्यांना एजाज आणि पवित्रा यांच्या नात्याबद्दल कळले तेव्हा त्यांना सर्वात जास्त आनंद झाला होता. अधिकृत निवेदनात, एजाजच्या प्रवक्त्याने हे देखील उघड केले की, त्यांच्या नातेसंबंधात धर्म कधीच नव्हता आणि आता त्यांचं नातं संपलं असताना या प्रकरणात त्याला विनाकारण ओढलं जात आहे”.
आणखी वाचा – आई झाल्यानंतर राधिका आपटेचे गरोदरणातील फोटोशूट समोर, अभिनेत्रीला वजनाबाबत वाटतेय काळजी, म्हणाली, “इतके वजन…”
प्रवक्त्याने पुढे सांगितले की, “जेव्हा पवित्रा यांना मुलाखतीत विचारण्यात आले की, त्यांच्या ब्रेकअपचे प्रमुख कारण धर्म आहे का, तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले, नाही, अजिबात नाही. धर्म ही कधीच समस्या नव्हती आणि तिने स्वतःच त्यांच्या नात्याच्या सुरुवातीलाच सांगितले की ती धर्मांतर करणार नाही”.