टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असतात. काही मालिका त्यांच्या वेगळ्या कथानकामुळे, कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या बनलेल्या असतात. अशा मालिकांपैकी म्हणजे एक म्हणजे ‘अप्पी माझी कलेक्टर’ ही मालिका आहे. अमोलच्या आजारपणामुळे ही मालिका सध्या नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. आजारामुळे सर्वजण त्याला आनंदी ठेवण्यासाठी त्याच्या प्रत्येक सगळ्या इच्छा आणि हट्ट पूर्ण करत आहेत. त्यामुळे ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही आता नव्या टप्प्यावर आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अमोलच्या हट्टापायी अर्जुन व अप्पी यांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आनंदी वातावरण होते.
अशातच आता या आनंदी वातावरणात मीठाचा खडा पडला आहे. मालिकेच्या नुकत्याच आलेल्या नवीन प्रोमोने आगामी भागाची झलक दाखवण्यात आली आहे. मालिकेच्या आगामी भागात अमोलच्या आजापरणाचे आणखी गंभीर स्वरूप पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये अमोल व्हीलचेअरवर बसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याला अशा अवस्थेत बघू सगळेच काळजीत पडतात. सगळेजण अर्जुनला अमोलला हे काय झालं आहे असं विचारतात. त्यानंतर अर्जुन अमोलविषयी सांगताना असं म्हणतो की, “अमोलच्या केमोथेरपीचा हा परिणाम आहे. केमोमुळे त्याला उभं राहता येत नाहीये”.
आणखी वाचा – हॉस्पिटलमधून परतल्यावर हिना खानची ‘अशी’ झाली आहे अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली, “माझ्या हृदयाचे…”
अर्जुनचे हे उत्तर ऐकून सर्वांनाच धक्का बसतो आणि अमोलची ही अवस्था बघून सगळे दुखावतात. मालिकेचा हा नवीन प्रोमो व मालिकेच्या कथानकात आलेला हा ट्विस्ट सर्वांनाच धक्कादायक आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय पाहायला मिळणार? अमोल यातून बाहेर पडणार का? या सगळ्यात त्याला अप्पी-अर्जुनची साथ कशी लाभणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान, अमोल या आजाराशी धाडसाने लढत आहे. त्याला बरे करण्यासाठी अप्पी-अर्जुन आणि त्यांचे कुटुंब प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच्या आजारपणामुळे घरातील सर्व जण चिंतेत असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच केमोथेरपीमुळे त्याचे केस गळत असल्याचा सीन दाखवण्यात आला होता. या सीनमध्ये अर्जुन व अप्पी त्याचे केस कापण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर आता त्याला चालता येत नसल्याचे पाहून पुन्हा सर्व जण चिंतेत पडले आहेत.