Nidhi Seth Second Marriage : ‘बिग बॉस १८’चा विजेता करण वीर मेहरा सध्या सर्वत्र आहे. करणने सलग दोन रिॲलिटी शोची ट्रॉफी जिंकली आहे. करण वीर मेहरा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याची पूर्वाश्रमीची पत्नी निधी सेठ हिने दुसरे लग्न केले आहे. निधीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. निधीने मंदिरात लग्न केले आणि प्रेमासाठी एक खास पोस्ट शेअर केली. करण वीर मेहरापासून विभक्त झाल्यानंतर निधी सेठ तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं असून निधीने अगदी सध्या पद्धतीने लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित होत आहेत.
बँगलोरमधील मंदिरात निधीचे लग्न झाले आहे. निधीने अत्यंत साधेपणाने लग्न केले आहे. लग्नसाठी तिने गुलाबी रंगाची बनारसी साडी नेसली आहे आणि सोन्याच्या दागिन्यांसह तिचा देखावा पूर्ण केला आहे. त्याच वेळी, निधीच्या नवऱ्याने निळ्या रंगाच्या फुलांचा कुर्ता पायजामा घातला आहे. हे लग्नाचे फोटो निधीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि लिहिले आहे की, “आपण मला हे दाखवून दिले की प्रेम हा एक संघर्ष नाही तर एक सुंदर प्रवास आहे. आमच्या लग्नात, आम्हीचे महत्त्व मीपेक्षा अधिक आहे. तुमची निष्ठा आणि काळजी मला मोकळे करते आणि मला खात्री आहे की आमचा बाँड दररोज तसाच आहे”.
निधीने पुढे लिहिले, “गेल्या दोन वर्षांपासून तू आठवणींचे खजिन्यात रुपांतर केले आहेस आणि प्रत्येक आनंदात आणि आव्हानात माझ्याबरोबर उभा राहिला आहेस. तुमचा पाठिंबा, दयाळूपणा आणि आमच्यातील सुंदर नात्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझे समर्थन केल्याबद्दल, मला होकार दिल्याबद्दल आणि माझे आयुष्य प्रेमाने भरल्याबद्दल धन्यवाद. माझे तुझ्यावर प्रेम आहे S.K “.
आणखी वाचा – श्वानाला कार चालकाने धडक दिल्यानंतर आस्ताद काळेने पोलिसांनाही घ्यायला लावली दखल, अभिनेत्याचं कौतुकास्पद काम
निधी आणि करणचे २०२१ मध्ये कोविडच्या काळात लग्न झाले होते पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. हे जोडपे २०२३ मध्ये वेगळे झाले. आता करणपासून वेगळे झाल्यानंतर दोन वर्षांनी निधीने दुसरे लग्न केले आहे.