Dharmendra health update : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अलीकडेच खराब झाली होती. श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून त्यांना सुमारे आठवडाभरापूर्वी डिस्चार्ज देण्यात आला. आता त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. आणि आता त्यांची तब्येत किती सुधारली आहे याबाबत अपडेट समोर आली आहे. ८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. सूत्रांनी गेल्या बुधवारी एनडीटीव्हीला सांगितले की, ज्येष्ठ अभिनेते आता पूर्वीपेक्षा चांगले आहेत.
धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबरच्या काही दिवसांपूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची पहिली बातमी आली. अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलींनाही बोलवण्यात आले होते. पण हेमा मालिनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बरे होत असल्याचे सांगितले.
Along with my 'bestest half' @PoonamSinha went to meet, greet & God Bless, our very dear family friend, one of the finest human beings, star/actress, par excellence, artist of the highest calibre, an able Parliamentarian @dreamgirlhema
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) November 17, 2025
Our prayers are with them all & we inquired… pic.twitter.com/yc0pfHkpT2
धर्मेंद्र यांना १२ नोव्हेंबरला डिस्चार्ज देण्यात आला. आता त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. इंटरनेटवर एक व्हिडीओ देखील समोर आला होता, ज्यामध्ये धर्मेंद्र बेडवर होते आणि त्यांची पत्नी प्रकाश कौरसह इतर लोक रडत होते. हा व्हिडीओ गुप्तपणे रेकॉर्ड करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. या आठवड्याच्या सुरुवातीला शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी धर्मेंद्र यांच्या तब्येतीची माहिती दिली होती. त्यांनी हेमा मालिनीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले होते की, “माझ्या प्रिय मित्राला भेटण्यासाठी, त्यांच्या तंदुरुस्तीची विचारपूस करण्यासाठी पूनम सिन्हासोबत गेलो होतो… आम्ही त्यांच्या, माझा मोठा भाऊ आणि कुटुंबाच्या हिताची चौकशी केली”.
आणखी वाचा – मॉड्युलर किचन, आकर्षक इंटेरियर अन्…; आतून असं आहे सूरज चव्हाणचं घर, पाहा Inside Video
यापूर्वी अमिताभ बच्चनही धर्मेंद्र यांना त्यांच्या घरी भेटायला आले होते. ते रुग्णालयात असताना शाहरुख खान, सलमान खान, अमिषा पटेल, आमिर खान आणि गोविंदा सारखे कलाकार त्यांना भेटायला आले होते.





