या वर्षी अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रभास, दीपिका पदूकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन यांच्या प्रमुख भूमिका असणारा बहुचर्चित चित्रपट ‘कल्की २८९८ एडी’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. तसेच दुसऱ्या दिवशीदेखील हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसून येत आहे. प्रभासच्या चित्रपटाचे पहिल्या दिवशीच्या कामाईचे आकडे समोर आले आहेत. यावरुन हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंत पडलेला दिसून येत आहे. (kalki 2898 AD movie collection)
मागील काही कालावधीपासून प्रभास व दीपिकाच्या चित्रपटाची चर्चा सुरु होती. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जादू केलेली दिसून येत आहे. लवकरच हा चित्रपट रेकॉर्ड तोडेल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने या चित्रपटाच्या दुसऱ्या चित्रपटाच्या कामाईचे आकडे समोर आले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ५४ कोटी रुपयांपर्यंत कमाई केली आहे. म्हणजेच दोनच दिवसांत या चित्रपटाने १५० कोटी रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने सुमारे ९५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली असून जगभरात या चित्रपटाने १९१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.या आकड्यांमुळे भारतीय चित्रपटगृहांमध्ये सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘कल्की २८९८ एडी’चा समावेश झाला आहे.
‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाने अभिनेता यशचा चित्रपट ‘केजीएफ २’ची कमाई १५९ कोटी रुपये, प्रभासचा चित्रपट ‘सालार’ची कमाई १५८ कोटी रुपये, थलापती विजयचा चित्रपट ‘लिओ’ची कमाई १४२.७५ कोटी रुपये, ‘साहो’ चित्रपटाची कमाई १३० कोटी रुपये व शाहरुख खानचा चित्रपट ‘जवान’ची कमाई १२९ कोटी रुपये या सर्व चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे सोडले आहे. प्रभासच्या ‘बाहुबली २’ या चित्रपटानेही सुरुवातीच्या दिवसांत २१७ रुपयांची कमाई केली होती.