Malaika Arora Father Final Rites : अभिनेत्री मलायका अरोराचे सावत्र वडील अनिल मेहता यांच्या आत्महत्येच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वांद्रे येथील राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी मारत त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. मात्र, सध्या या प्रकरणी पोलिसांचा सखोल तपास व चौकशी सुरु आहे. पोलिस आता पुढील तपासणी करत असून त्यांच्या मृत्यूचे कारण लवकरच शोधून काढतील असे म्हटलं जात आहे. मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येची बातमी आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्रीसाठीच्या या कठीण काळात माजी पती अरबाजपासून ते एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरपर्यंत सर्वजण आणि संपूर्ण बॉलिवूड एकत्र उभे असल्याचे दिसत आहे.
आज मलायकाच्या वडिलांना निरोप देण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी येत आहेत. मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्यावर १२ सप्टेंबर रोजी म्हणजेच आज सांताक्रूझ येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. मलायकाचे वडील अनिल मेहता ६२ वर्षांचे होते. गुरुवारी मुंबईतील सांताक्रूझ येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मलायकाचे इंडस्ट्रीमधील सगळे जवळचे मित्र तसेच खान कुटुंबीय तिला धीर देण्यासाठी आणि अनिल मेहतांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी नुकतेच पोहोचले आहेत.
आणखी वाचा – “मी आजारी आहे आणि…”, मृत्यूपूर्वी मलायकाच्या वडिलांनी लेकींना सांगितली होती ‘ही’ गोष्ट, सूत्रांचा दावा
यावेळी मलायका खूपच भावूक दिसली. त्यानंतर त्याचा मुलगा अरहान आईची काळजी घेताना दिसला. यावेळी मलायकाची आई जॉयस खूपच भावुक आणि खचलेली दिसली. पतींच्या निधनाने तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. अर्जुन कपूरही मलायकाबरोबर तिच्या कठीण काळात दिसत आहे. अभिनेत्रीच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठीही ते पोहोचले आहेत. मलायकाच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेन्स लुईसही पोहोचले आहेत. अरबाज खान त्याची पत्नी शूरा खानबरोबर आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचला आहे.
मलायकाच्या वडिलांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आज अरबाज खान, त्याची पत्नी शूरा, अर्जुन कपूर, फराह खान, करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, जिनिलीया-रितेश, सोहेल खान, गौहर खान, गीता कपूर, मोहित मारवाह, टेरेंस, अर्शद वारसी, गुरू रंधावा, मिनी माथूर, पुनित मल्होत्रा, किम शर्मा असे सगळे कलाकार मलायका व तिच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी पोहोचले आहेत.