Shah Rukh Khan Home Mannat History : अमिताभ बच्चन यांच्या नावासह जलसा, सलमान खान यांच्यासह गैलेक्सी अपार्टमेंट ते शाहरुख खानच्या नावासह मन्नत या त्यांच्या घरांची नेहमीच चर्चा पाहायला मिळाली आहे. कलाकारांच्या या घरांची नेहमीच काही ना काही अपडेट मिळत असते. यादरम्यान, सध्या शाहरुख खानच्या मन्नतची विशेष चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. कारण असे आहे की पुढील दोन वर्षे, शाहरुख या घराच्या बाल्कनीत उभे राहून चाहत्यांच्या भेटीस येणार नाही. शाहरुख त्याच्या मन्नतच्या बाल्कनीत उभा राहून चाहत्यांना भेट देत असतो. शाहरुखची एक झलक पाहायलाही त्याचे चाहतेमंडळी मन्नतसमोर गर्दी करताना दिसतात.
शाहरुखच्या मन्नतचे नूतनीकरण होणार आहे. यामुळे, त्याचे कुटुंब आता पाली हिल, वांद्रे येथे एका नवीन ठिकाणी राहायला जाणार आहे. बरं, अलीकडेच असे नोंदवले गेले आहे की घराचे नूतनीकरण केले जाते आहे. परंतु या घराशी संबंधित अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला फारशा ठाऊक नाहीत. मनात हे फक्त एक घर नाही तर ऐतिहासिक वारसा देखील आहे. थोडं मागे जाऊन पाहिलं तर मन्नतचा इतिहास फक्त २००१ मध्ये शाहरुखने हे घर विकत घेतलं हा आहे. परंतु त्याचा एक समृद्ध इतिहास आहे जो ऐकून आश्चर्य वाटेल. वास्तविक या बंगल्याचा इतिहास १८व्या शतकाशी संबंधित आहे. जीक्यू इंडियाच्या म्हणण्यानुसार, हा बंगला भारतीय राजाने बांधला होता. अहवालानुसार, १८व्या शतकाच्या शेवटी, मंडी (हिमाचल प्रदेश शहर)चा राजा बिजय सेन यांनी त्यांच्या एका राणीसाठी हा महल बांधला होता. म्हणजेच, जसे शाहजानने त्याची राणी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला, त्याप्रमाणे येथे काहीतरी घडले आहे.
सिटी क्रॉनिकल आणि खाकी हेरिटेज फाउंडेशनचे संस्थापक भारत गोथोस्कर आणि इतिहास तज्ज्ञ देबॅशिश चक्रवर्ती यांचे म्हणणे आहे की, डिसेंबर १९०२ मध्ये राजा बिजय सेन यांच्या निधनानंतर १९१५ मध्ये ही मालमत्ता पेरिन मानेकजी बाटलीवाला यांना विकली गेली. या अहवालात असेही सांगितले गेले आहे की मालमत्ता खरेदी केल्यानंतर, बाटलीवालाने विला वियना असे या महलला नाव दिले आणि यामागील कारण म्हणजे त्यांना वियना यांचे संगीत आवडायचे.
काही काळानंतर, बाटलीवालाने हा बंगला त्याची बहीण खुर्शीदबाई संजन यांना विकली, जी तिच्या मुलांच्या अभावामुळे बहिण गुलबानूला गेली. गुलबानूच्या मुलाचे नाव नारीमान दुबॅश होते ज्यांना ही मालमत्ता वारसा हक्काने मिळाली. दुबॅशने नंतर ही मालमत्ता एका बिल्डरला विकली. यानंतर कथा अधिक मनोरंजक बनली. ज्या बिल्डरने ही मालमत्ता घेतली त्याने ते खरेदी करण्यासाठी सलमान खानला ऑफर केली. बॉलिवूड हंगामाच्या मुलाखतीत सलमान खान यांनीही हे सांगितले आहे. त्याने सांगितले होते की जेव्हा ऑफर माझ्याकडे आली तेव्हा मी करिअर सुरु केले आणि पप्पांनी असे सांगितले होते की, आपण अशा मोठ्या घराबरोबर काय करणार?.
आणखी वाचा – लाडक्या बहिणींची फसवणूक, नक्की खरं काय?
१९९७ च्या यस बॉस या चित्रपटातील काही गाणी विला वियनासमोर चित्रित झाली. यावेळी, शाहरुखला हे घर इतके आवडले की २००१ मध्ये त्याने ते विकत घेतले. जेव्हा शाहरुखने हा बांगला खरेदी केला होता तेव्हा त्यात बरेच भाग मोडले होते. यानंतर त्याने त्या घराचे नूतनीकरण केले आणि मन्नतला आधुनिक टच देत स्मार्टहाऊस बनविले. जेव्हा शाहरुखने हा बंगला विकत घेतला, तेव्हा त्याची किंमत १३ कोटी होती, तर आता हा एकदा २०० कोटींच्या घरात पोहोचला आहे. यांत स्विमिंग पूल, वैयक्तिक सभागृह, जिम यासारख्या अनेक सुविधा आहेत. आता नूतनीकरण करुन ते अधिक चांगले करण्याचा प्रयत्न खान परिवाराकडून केला जात आहे.