Shah Rukh Khan Death Threat : अभिनेता सलमान खान सध्या खूप चर्चेत आहे. एनसीपी नेते व सलमानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूडमधील सगळ्याच कलाकारांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सलमान खानला मिळणाऱ्या धमकीच्या बातम्या ताज्या असताना, बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानलाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायपूर येथील फैजान नावाच्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता. हा फोन शाहरुख खानच्या प्रॉडक्शन कंपनी ‘रेड चिलीज’च्या ऑफिसमध्ये आला होता, त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ताबडतोब, किंग खानला मारण्याच्या धमकीचे फोन आल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. त्यानंतर मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. मुंबई पोलिसांचे पथक छत्तीसगड रायपूरला पोहोचले आहे. वास्तविक, पोलिसांनी कॉल ट्रेस केला तेव्हा तो रायपूरचा असल्याचे कळून आले. शेवटचे ठिकाण बाजाराचे असून पोलिस तेथे पोहोचले असून चौकशी करत आहेत.
आणखी वाचा – प्रियांका चोप्राची लेक आहे फारच हुशार, दोन वर्षाची मालती शिकत आहे डान्स, ‘ते’ दृश्य पाहून नेटकरीही हैराण
बॉलिवूड किंग खानच्या जीवाला धोका आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर येथील फैजान खान नावाच्या व्यक्तीने अभिनेता शाहरुख खानला फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट आला आहे. याप्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरची प्रत समोर आली आहे. शाहरुख खानला मिळालेल्या धमकीची तक्रार ५ नोव्हेंबर २०२४ रोजी म्हणजेच मंगळवारी दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरच्या प्रतीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
एफआयआरमध्ये धमकीची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, “शाहरुख खान मन्नत बँडस्टँडचा आहे, नाही का? जर त्याने मला ५० लाख रुपये दिले नाहीत तर मी त्याला मारून टाकीन”. शाहरुखला आलेल्या या धमकीने कलाक्षेत्रालाही खूप मोठा धक्का बसला आहे. अखेर शाहरुख खानच्या या धमकी देणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं समोर आलं आहे.