बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण व रणवीर सिंह हे नेहमी चर्चेत असतात. हे वर्ष सुरु झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आई-वडील होणार असल्याची घोषणा केली होती. सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले होते. त्यानंतर अनेकदा त्यांना एकत्रितपणे स्पॉट केले गेले. तसेच काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे बोल्ड फोटोशूटदेखील शेअर केले होते. या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती मिळाली होती. अशातच आता काल (8 सप्टेंबर) दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (deepika padukone and ranveer singh baby name)
गणेशोत्सवादरम्यान दीपिकाने मुलीला जन्म दिल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करुन याबद्दलची माहिती देण्यात आली. चाहत्यांनी तसेच सर्व सेलिब्रिटिंनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता त्यांच्या मुलीचे नाव काय ठेवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याबद्दल आता रणवीरची जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. होणाऱ्या बाळाचे नाव काय असणार? याची लिस्ट रणवीरने तयार केली असल्याचे सांगितले होते. ‘द बिग पिक्चर’च्या एका एपिसोडमध्ये त्याने लिस्टमधील एक नाव सांगितले होते.
यावेळी शौर्यवीर नावाच्या एका स्पर्धकाशी बोलताना रणवीरने त्याचे नाव विचारले. त्याने शोमध्ये सांगितले की, “मी बाळाच्या नावांचा विचार करत आहे. पण तुम्हाला काही हरकत नसेल तर मला तुमच्या नावाचा विचार करेन. मी माझ्या मुलाचं नाव शौर्यवीर ठेवण्याचा विचार करत आहे”. पण त्याच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे.
दरम्यान, २०२२ साली रणवीरचा ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याला विचारले की, “मुलगा हवा की मुलगी?”, त्यावर त्याने उत्तर दिले की, “कोणीही चालेल. जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा शिरा पाहिजे की लाडू असं तर तुम्ही विचारत नाही ना? जे मिळत ते श्रद्धेने घेता. त्यामुळे बाळाच्या बाबतीतदेखील मी सारखाच विचार करतो”. त्यामुळे आता रणवीर व दीपिका लेकीचं काय नाव ठेवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.