बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून गरोदर असल्यामुळे विशेष चर्चेत होती. आता अभिनेत्रीने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. रणवीर व दीपिका आई-बाबा झाले आहेत. दीपिकाने चिमुकलीला जन्म दिला आहे. रणवीर व दीपिका यांना मुलगी झाली आहे. दोघांनीही लेक झाली असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. दीपिका व रणवीर यांच्या बाळाच्या येण्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या खास मुहूर्तावर आता अभिनेत्री दीपिका पती रणवीर सिंगने गुडन्यूज दिली आहे. (Deepika Padukone Baby Girl)
दीपिकाचा हॉस्पिटलमधील व्हिडीओ व्हायरल होताच तिचे चाहते आनंदाची बातमी ऐकण्याची वाट पाहत होते. अखेर आता अभिनेत्रीने चाहत्यांच्या आनंदाची बातमी देत धक्का दिला आहे. अभिनेत्रीची डिलिव्हरीची तारीख या महिन्यात असल्याचे सांगण्यात आलं होतं. दीपिका व रणवीर यांनी आता त्यांच्या पहिल्या लेकीचे स्वागत केले आहे. दीपिका पदुकोण व रणवीर सिंग त्यांच्या कुटुंबासह मुंबईतील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आहेत. बाळाच्या येण्याच्या बातमी ऐकून सारेच खूप खुश झाले आहेत.
रणवीर व दीपिका यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या थाटामाटात रणवीर व दीपिका यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. दीपिका व रणवीर यांच्यातील बॉण्डिंग नेहमीच साऱ्यांच्या पसंतीस पडतं. अनेक कार्यक्रमांमध्ये देखील रणवीर व दीपिका एकमेकांबद्दल सांगत असतात. बऱ्याच चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र पाहायला मिळाली. लग्नानंतर दीपिकाने तिच्या करिअरकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही.
आता लग्नाला पाच वर्ष पूर्ण होताच दोघांनी त्यांच्या आयुष्याच्या वाटेवरील एक पाऊल पुढे टाकले आहे. दोघेही आई-बाबा झाले आहेत. गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी गोंडस चिमुकलीला जन्म दिला आहे. एका मुलाखतीत दीपिकाला जेव्हा पालक बनण्याबद्दल विचारले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य होते. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली होती की, “नक्कीच. रणवीर व मला लहान मुले आवडतात. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत जेव्हा आम्ही आमचं स्वतःचं कुटुंब सुरू करु”.