सोमवार, जून 2, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोरियोग्राफर मुदस्सर खानला कन्यारत्न, लग्नाच्या एका वर्षात घरी चिमुकलीचं आगमन, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 23, 2024 | 2:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mudassar khan blessed with baby girl

मुदस्सर खानच्या घरी चिमुकलीचे आगमन

मनोरंजन क्षेत्रातील अनेकांच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. बॉलिवूडमधील अनेक जोड्या आई-बाबा झाले आहेत. अशातच आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मुदस्सरच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. २३ डिसेंबर २०२४ रोजी मुदस्सरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती शेअर केली आहे. लग्नाच्या एका वर्षानंतर ही गोड बातमी मुदस्सरने चाहत्यांना दिली आहे. गेल्या वर्षी ३ डिसेंबर २०२३ रोजी मुदस्सर व रिया किशनचंदानीबरोबर लग्नबंधनात अडकला होता. त्याने आता मुलगी झाल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत मुदस्सरने काय सांगितलं? हे आपण आता जाणून घेऊया. (mudassar khan blessed with baby girl)

मुदस्सरने मुलीच्या जन्माची बातमीदेताना सांगितले की, “अल्लाहचे आशिर्वाद व कुटुंबं, मित्रपरिवाराच्या प्रार्थनांमुळे आम्ही मिस्टर व मिसेस खान यांना घोषणा करताना आनंद होत आहे की आमच्याकडे मुलगी जन्माला आली आहे. अलहमदुलिल्लाह. तुमच्या प्रेम व आशीर्वादासाठी धन्यवाद”. तसेच पोस्ट शेअर करत त्यामध्ये होली हॉस्पिटलमधील डॉ. अंजूम व टीमचे आभार मानले आहेत. मुदस्सरने केलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – दिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये महिलेबरोबर गैर प्रकार, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, पोस्ट व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Mudassar Khan (@beingmudassarkhan)

गेल्या वर्षी ३ डिसेंबर २०२३ रोजी मुदस्सरने रिया किशनचंदानीबरोबर लग्न केले. त्याने फोटो पोस्ट करत त्याच्या लग्नाची माहिती दिली. या जोडीने पारंपरिक पांढरा आऊटफिट परिधान केला आहे. मुदस्सरने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली असून रियानेदेखील  सेम रंगाचा घागरा परिधान केलेला दिसून आला. लग्नातील त्यांचे गोड फोटो सोशल मीडियावर शेअर करत मुदस्सरने लिहिले की, “अलहमदुलिल्लाग, जगातील सर्वात सुंदर रिया किशनचंदानीबरोबर लग्न झाले आहे. माझ्या सर्व मित्रांना व माझ्या माणसांनी पाठिंबा दिल्याबद्दल खूप धन्यवाद”.

आणखी वाचा – Paataal Lok Season 2 ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जयदीप अहलावतच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

दरम्यान मुदस्सरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो बॉलिवूडमधील अनेक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तसेच ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमामध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसून आला होता. त्याच्या नृत्याचे अनेक चाहतेदेखील आहेत. सध्या तो वडील झाल्यामुळे खूप खुश असलेला दिसून येत आहे.   

Tags: baby girlbollywoodmudassar khan
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

seema kapoor torchered by own mother
Entertainment

आईकडून मारहाण, टॉर्चर अन् हाल; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, जन्मदातीच वैरी ठरली तेव्हा…

जून 2, 2025 | 7:00 pm
Premachi Goshta fame Swarda Thigales car accident
Entertainment

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

जून 2, 2025 | 5:58 pm
Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Next Post
sachet tondon baby boy

सुप्रसिद्ध गायिका परंपराने दिला गोंडस मुलीला जन्म, नवऱ्याने शेअर केला व्हिडीओ, दाखवली बाळाची पहिली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.