मुकेश-नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची सध्या देशभरात चर्चा आहे. १२ जुलै रोजी अनंत व राधिक मर्चट यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मात्र त्याआधी १ जुलैपासून दोघांच्याही लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी अमेरिकन पॉपस्टार जस्टीन बीबरने धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता. याची चर्चा संपूर्ण जगभरात पाहायला मिळाली. त्यांच्या लग्नासाठी आता केवळ तीन दिवस बाकी आहेत. नुकताच त्यांचा हळदी समारंभ पार पडला. या समारंभासाठी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. (Anant Ambani-Radhika Merchant Marriage)
या सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबातीलही सभासद यावेळी दिसून आले होते. यावेळी सलमान खान, सारा अली खान, जान्हवी कपूर, रणवीर सिंह यांची उपस्थिती पाहायला मिळाली. सर्वांचे हळदीमधील अनेक फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये हळदीत न्हायलेले सगळे कलाकार बघायला मिळत आहेत.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह हा संपूर्ण हळदीमध्ये रंगलेला बघायला मिळत आहे. त्याला पूर्णतः हळदीमध्ये बघायला मिळत आहे. जेव्हा तो समारंभातून बाहेर जाताना दिसला. या समारंभाचे आयोजन अंबानी यांच्या अॅंटीलिया या निवासस्थानी करण्यात आले होते. याच वेळी सलमानदेखील हळदीनंतर वेगळ्या कपड्यांमध्ये दिसून आला. जेव्हा सलमान समारंभासाठी गेला तेव्हा त्यांनी काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. मात्र जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला दिसून आला.
याशिवाय अंबानी कुटुंबातील सदस्यदेखील हळदीमध्ये रंगलेले दिसून आले. मुकेश यांचे लहान बंधु अनिल अंबानी पत्नी टिना अंबानीबरोबर दिसून आले. त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता तर त्यांच्या चेहऱ्यावर, हातावर हळद लागलेली दिसून आली. दोघांनीही फोटोसाठी छान पोज दिल्या.
१२ जुलै रोजी मुंबई येथील जिओ वल्ड कॉनव्हेंशन सेंटरमध्ये अनंत व राधिका यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. लग्नानंतर १३ जुलै व १४ जुलै रोजीदेखील विधी होणार आहेत.