Asha Bhosle death : १२ एप्रिल २०२६ रोजी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट आणि संगीत जगतावर शोककळा पसरली आहे. काही वेळापूर्वीच आशा भोसले यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले होते, त्यानंतर राजकीय ते बॉलीवूडपर्यंतचे अनेक लोक त्यांच्या घरी पोहोचले असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. आशा यांच्या अंतिम दर्शनाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कठीण प्रसंगी जावेद अख्तर त्यांच्या पत्नी शबाना आझमी यांच्यासह भोसले कुटुंबीयांचे धैर्य वाढवण्यासाठी आले आणि त्यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पत्नी शबाना आझमी याही पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसल्या. या दु:खाच्या वेळी पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आल्या होत्या.
राज ठाकरे यांनीही आशा भोसले यांच्या घरी पोहोचून त्यांना अखेरचा निरोप दिला. तसेच ते यावेळी जावेद अख्तर यांच्याशी बोलताना दिसले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्या कार्यकर्त्यांसह आशा भोसले यांच्या घरी आले आणि त्यांनी आशा भोसले यांना अखेरचे पाहिले. तसेच त्यांना पुष्प अर्पण केले.
आणखी वाचा – ‘इन आँखों की मस्ती’ पासून ‘दम मारो दम’ पर्यंत, आशा भोसले यांची ही १० गाणी आजही लोकप्रिय, वाचा गाण्यांची यादी
या दु:खात पद्मिनी कोल्हापुरी यांनीही भोसले कुटुंबीयांच्या घरी येऊन साबीला धीर दिला.
जॅकी श्रॉफही आपल्या कुटुंबासह आशा भोसले यांना शेवटचे पाहण्यासाठी आले होते. या घटनेचे दु:ख त्यांच्या डोळ्यातही दिसले.
याशिवाय विद्या बालनही कारमध्ये भोसले परिवारच्या घराजवळ दिसली, आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.
विद्या बालनसोबत उर्मिला मातोंडकरनेही तिला या दुःखात साथ देत श्रद्धांजली वाहिली.





