शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आशा भोसले यांना शेवटचं पाहताना नात जनाईची वाईट अवस्था, लेकही ढसाढसा रडला…; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 13, 2026 | 11:55 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Asha Bhosle death

Video : आशा भोसले यांना शेवटचं पाहताना नात जनाईची वाईट अवस्था, लेकही ढसाढसा रडला…; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Asha Bhosle death : सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. १२ एप्रिल २०२६ रोजी आशा भोसले यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. आशा भोसले यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर नेते, सेलिब्रिटी, सर्वजण शोक व्यक्त करत आहेत. आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीयही शोक सागरात बुडाले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले ढसाढसा रडताना दिसले. आईच्या जाण्याने आनंद यांना अश्रू अनावर झाले. तर आशा भोसले यांची नात जनाई भोसलेही रडताना दिसली. आजी आणि मुलीचं जवळचं नातं होतं. बऱ्याचदा दोघी एकत्र स्पॉट होताना दिसल्या.

आनंद भोसले यांनी काल पोस्ट करत म्हटलं, “माझी आई आशा भोसले यांचे आज निधन झाले. उद्या दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत”. आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती की, “आशा भोसले यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे शनिवारी रात्री दाखल करण्यात आले होते. पण बहु अवयव निकामी झाल्याने आशा भोसले यांचा मृत्यू झाला”. वैयक्तिक आयुष्यात आशा भोसले यांनी दोनदा लग्न केले. तिने पहिले लग्न गणपत राव यांच्याशी केले. मात्र, दोघेही ११ वर्षांनंतर वेगळे झाले. आशा भोसले यांना गणपत रावांपासून तीन मुले (वर्षा भोसले, हेमंत भोसले आणि आनंद भोसले) होती. यानंतर आशा भोसले यांनी १९८० मध्ये संगीत दिग्दर्शक आरडी बर्मन यांच्याशी लग्न केले. त्या आशा भोसले यांच्यापेक्षा ६ वर्षांनी लहान होत्या. आशा भोसले आणि आरडी बर्मन यांना स्वतःची कोणतीही मुले नाहीत.

आणखी वाचा – Asha Bhosle death : जावेद अख्तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशा भोसले यांना अंतिम निरोप देण्यासाठी दिग्गजांची गर्दी

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

गायिका वर्षा भोसले यांची मुलगी वर्षा भोसले हिने २०१२ मध्ये आत्महत्या केली होती. २०१५ मध्ये त्यांचा मुलगा हेमंत भोसले याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले हा मोठा उद्योगपती आहे. अशा स्थितीत आशा भोसले यांच्या संपत्तीचा खरा वारस त्यांचा एकुलता एक मुलगा आनंद भोसले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा – ‘इन आँखों की मस्ती’ पासून ‘दम मारो दम’ पर्यंत, आशा भोसले यांची ही १० गाणी आजही लोकप्रिय, वाचा गाण्यांची यादी

आशा भोसले यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम गाणी गायली. हिंदी व्यतिरिक्त तिने एकूण 20 भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. गायनासोबतच आशा भोसले यांनी अभिनयातही हात आजमावला. 2013 मध्ये आशा भोसले यांनी ‘माई’ या मराठी चित्रपटात काम केले होते. आशा भोसले यांच्या सदाबहार गाण्यांमध्ये ‘इन आँखों की मस्ती के’, ‘दिल चीज क्या है’, ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’, ‘अब के बरस भेजा भैया को बाबुल’, ‘ये मेरा दिला’, ‘पिया तू अब तो आजा’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.

Tags: asha bhosaleAsha Bhosle deathRIP Asha Bhosle
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
asha bhosle biography

Asha Bhosle Death : दोनदा लग्न, सासरच्या घरी छळ आणि…; आशा भोसलेंचं आयुष्य होतं खडतर, मुलीची आत्महत्या तर मुलाचाही मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.