रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राधिका आपटे होणार आई, रेड कार्पेटवर बेबी बंप दाखवत दिली गुडन्यूज, कलाकार व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव  

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 17, 2024 | 10:29 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood and Marathi actress Radhika Apte is going to be a mother soon and she shared her baby bump photos on social media

बॉलिवूड व मराठी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच आई होणार आहे

Radhika Apte Pregnancy : मराठीसह, साऊथ आणि बॉलिवूड क्षेत्रात आपलं नाव गाजवणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. आपल्या सशक्त अभिनयाने राधिकाने मनोरंजनाची मोठी स्क्रीन असो वा ओटीटीद्वारे मोबाइलची छोटी स्क्रीन असो, अशा सर्वच क्षेत्रात आपली मुशाफिरी केली आहे. अशातच अभिनेत्रीबद्दल एक गुडन्यूज समोर येत आहे, ती म्हणजे राधिका लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री राधिका आपटे आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये १६ ऑक्टोबर रोजी ‘सिस्टर मिडनाइट’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला तिने उपस्थिती दर्शवली होती. तिथे तिने आपला बेबी बंप दाखवत सगळ्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. राधिकाने तिच्या या बेबी बंपच्या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Radhika Apte Pregnancy)

राधिकाने शेअर केलेल्या आपल्या फोटोमध्ये गरोदरपणाचा उल्लेख केला नाही. ‘सिस्टर मिडनाइट यूके प्रीमियर #lff2024’, असे कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती रेड कार्पेटवर चित्रपटातील कलाकारांबरोबर दिसली. यावेळी राधिकाने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, राधिकाच्या प्रेग्नेंसीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही. तसेच अभिनेत्रीने याबाबत कोणतेही भाष्य केलेलं नाही. पण अभिनेत्रीने तिच्या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये बेबी बंप दाखवून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

आणखी वाचा – KBC मध्ये ५० लाखांसाठी सांगलीच्या मुलाला विचारण्यात आला ‘तो’ प्रश्न, पण दिलं चुकीचं उत्तर, तुम्हाला उत्तर माहित आहे का?

राधिकाने शेअर केलेल्या तिच्या फोटोखाली अनेक बॉलिवूड व मराठी कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. “तुझ्या गुडन्यूजबद्दल अभिनंदन”,  “अप्रतिम दिसत आहेस”, “खूप खूप शुभेच्छा”, “तुझं खूप खूप अभिनंदन” अशा अनेक कमेंट्सद्वारे कलाकार व चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. राधिकाच्या या प्रेग्नन्सीच्या बातमीने तिचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. त्यामुळे लवकरच तिच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री, शरद पवार गटात केला प्रवेश, म्हणाली, “पक्षाने जबाबदारी दिली तर…”

दरम्यान, लग्नाच्या १२ वर्षांनी राधिका बाळाला जन्म देणार आहे. राधिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच श्रीराम राघवन दिग्दर्शित आणि कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटामध्ये दिसली होती. तसंच लवकरच ती थ्रिलर सीरिज ‘अक्का’मध्येदेखील झळकणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन नवोदित लेखक-दिग्दर्शक धर्मराज शेट्टी करत आहेत.

Tags: Radhika Apte PregnancyRadhika Apte Pregnancy Marathi NewsRadhika Apte Pregnancy News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Arbaaz Khan

बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमानच्या जीवाला धोका, खान कुटुंब तणावात, अरबाजने सांगितली कशी आहे परिस्थिती, म्हणाला, "बरेच काही चालू आहे आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.