Bollywood Couples Living Seperated : बॉलीवूडमध्ये अफेअर, लग्न, ब्रेकअप आणि घटस्फोट खूप सामान्य झाले आहेत. आजवर अनेक कलाकार मंडळींच्या घटस्फोटांची बातमी कानावर आली. तर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार जोडप्यांनी घटस्फोट घेतला नसून ते एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. बॉलिवूडचे अनेक कलाकार जोडपे विवाहित असूनही एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. ना त्यांनी विभक्त होण्याची घोषणा केली आहे, ना त्यांनी घटस्फोट घेतला आहे, पण तरीही ते वेगळे राहत आहेत. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने नुकताच खुलासा केला आहे की, ती व गोविंदा एकत्र राहत नाहीत. अभिनेत्याच्या पत्नीने खुलासा करत सांगितले की, तो व अभिनेता वेगवेगळ्या घरात राहतात.
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत सुनीता म्हणाली, “आमच्याकडे दोन घरं आहेत, आमच्या अपार्टमेंटसमोर एक बंगला आहे. माझे मंदिर आणि माझी मुले आम्ही फ्लॅटमध्ये राहतो. तर गोविंदा फ्लॅटसमोरील बंगल्यात राहतो. कारण त्याला बोलायला खूप आवडते, म्हणून तो १० लोकांना एकत्र करतो आणि त्यांच्याशी बोलतो, तर याउलट आम्हाला म्हणजेच मला आणि माझ्या मुलांना बोलायला फार आवडतं नाही. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत आहेत. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, ऐश्वर्या आता अभिषेकबरोबर जलसामध्ये राहत नाही. ती मुलगी आराध्यासह वेगळ्या घरात राहते.
‘टाइम्स नाऊ’च्या रिपोर्टनुसार, एक काळ असा होता जेव्हा ऋषी कपूर आणि नीतू कपूरमध्ये खूप भांडण व्हायची. अशा परिस्थितीत दोघेही वेगळे राहू लागले. धर्मेंद्र व हेमा मालिनीही एकत्र राहत नाहीत. खरे तर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीबरोबर दुसरे लग्न केले होते पण त्यांनी आजपर्यंत पहिली पत्नी प्रकाश कौरला घटस्फोट दिलेला नाही.
आणखी वाचा – Bigg Boss 18 च्या ग्रँड फिनाले पूर्वीच विजेत्याचे नाव समोर, कोण ट्रॉफी घरी घेऊन जाणार?
अशा परिस्थितीत धर्मेंद्र त्याची पहिली पत्नी आणि मुले सनी देओल आणि बॉबी देओलबरोबर राहतात. तर हेमा वेगळ्या घरात राहते. करीना कपूरचे आई-वडीलही एकमेकांपासून वेगळे राहतात. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, एकेकाळी बबिता कपूर आणि रणधीर कपूर यांच्यातील संबंध अतिशय नाजूक टप्प्यातून जात होते. तेव्हापासून दोघेही वेगळे राहत आहेत.