गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जात आहे. कोणी चांगल्या प्रकारे तर कोणी चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला याचाच वापर करून डीपफेक व्हिडीओचं प्रकरण बरीच वाढताना दिसत आहेत. बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेत्री याच्या शिकार झाल्या आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदाना, कतरिना कैफ, काजोलनंतर आता या सगळ्याचा आणखी एक अभिनेत्री शिकार झाली आहे. अभिनेत्री आलिया भट्टचा डीपफेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिची फेक प्रतिकृती अश्लील रित्या दाखवण्यात आली आहे. (alia bhatt deepfake video goes viral)
आलियाचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे. तिने उत्कृष्ट अभिनयातून सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. तसंच ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे पोस्ट चाहत्यांना बरीच आवडताना दिसतात. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. ज्यामुळे चाहत्यांबरोबर नेटकऱ्यांचीही चिंता बरीच वाढली आहे. व्हायरल होणाऱ्या डीपफेक व्हिडीओत एक व्यक्ती निळ्या रंगाचा फ्लोरल को-ऑर्ड सेट घातलेली दिसत आहे. ती कॅमेरासमोर अश्लील इशारे करतना दिसत आहेत. तर या व्हिडीओवर आलिया भट्टचा चेहरा लावला गेला आहे. हे सगळं अगदी लक्ष देऊन बघितल्यावर लक्षात येतं. अभिनेत्रीचा चेहरा कोणा दुसऱ्या मुलीच्या शरीरावर लावून इडीट केला आहे. या व्हिडीओवर बरेच कमेंट येत आहेत.

रश्मिका व कतरिनाच्या डीपफेक व्हिडीओवरुन सोशल मीडियासह इतर माध्यमांवर अनेक कलाकारांनी याविरुद्ध आवाज उठवला होता. स्वत: रश्मिकाने यासंबंधित एक पोस्टदेखील शेअर केली होती. या प्रकरणात अमिताभ बच्चन यांनीदेखील रश्मिकाला पाठिंबा दिला होता. या प्रकरणानंतर अशा विकृतीला आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाईची मागणीदेखील केली गेली. तरीही आलियाच्या या डीपफेक व्हिडीओवरून हे सर्व प्रकार आटोक्यात आलेले दिसत नाही.
रश्मिका मंदाना प्रकरणात दिल्ली पोलिसांनी १० नोव्हेंबरला एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर १५ नोव्हेंबरला आरोपीला अटक केली होती. अशातच आता काजोलच्या या व्हायरल व्हिडीओमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. काजोलच्या या व्हिडीओमुळे तिचे चाहते नाराज झाले असून अनेक माध्यामांतून ते यावर प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर असे कृत्य करणाऱ्याला शिक्षा देणाची मागणीदेखील करत आहेत.