मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लग्नाआधी एकत्र राहा आणि…”, बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा तरुण मंडळींना अजब सल्ला, म्हणाल्या, “बेडरुममध्ये एकमेकांना किती महत्त्व…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 10, 2024 | 4:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
zeenat aman on live in relationship

"लग्नाआधी एकत्र राहा आणि…", बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा तरुण मंडळींना अजब सल्ला, म्हणाल्या, "बेडरुममध्ये एकमेकांना किती महत्त्व…"

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज व सगळ्यांची लाडकी अभिनेत्री झीनत अमान या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नेहमी संपर्कात असतात. ती सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो, व्हिडीओ तसेच अनेक जुन्या आठवणी शेअर करत असते. त्यांच्या सुंदर रुपाच्या चर्चा आजही होत असतात. अशातच त्यांनी केलेल्या एका पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. झीनत यांनी चक्क लग्न न करता लिव्ह इनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.यामुळे आता त्यांच्या म्हणण्याचा नक्की अर्थ काय आहे यांवर सगळे अनेक तर्क-वितर्क मांडत आहेत. (zeenat aman on live in relationship)

झीनत यांनी आपल्या पाळीव कुत्र्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केलं आहे. ज्यामध्ये आपल्या चाहत्यांना कुत्र्याची ओळखदेखील करुन दिली आहे. त्यानंतर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेल्या मजकुरावर एक प्रतिक्रिया आली त्यावर त्यांनी उत्तरामध्ये लिहिले की, “तुमच्यातील कोणीतरी मला नातेसंबंधाबद्दल सल्ला मागितला. मी आता माझे काही विचार मांडणार आहे. हे विचार माझे स्वतःचे आहेत जे याआधी मी कधीही शेअर केले नव्हते”.

आणखी वाचा – “खासगी आयुष्य चव्हाट्यावर का आणता?”, साखरपुड्याच्या दीड वर्षांनंतर लग्न मोडल्यावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले, “लग्न म्हणजे खेळ…”

View this post on Instagram

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)

पुढे त्या म्हणाल्या की, “तुमच्यापैकी कोणी रिलेशनशिपमध्ये असेल तर त्यांनी आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहावे असा मी सल्ला देईन. मी माझ्या मुलांनादेखील हाच सल्ला दिला आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत”.

आणखी वाचा – “दूध पाजायलाही विसरते आणि…”, जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर रुबिना दिलैकची अशी झाली आहे अवस्था, म्हणाली, “लिहून ठेवते की…”

झिनत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “लग्न करायच्या आधी कुटुंबामध्ये मिसळताना, नाती बनवताना एक परीक्षा घ्यावी. दिवसातील काही तासांसाठी आपण स्वतःला खूप चांगले दाखवू शकतो. पण तुम्ही बाथरुम शेअर करु शकता का?, एकमेकांवरील राग व्यक्त करु शकता का? रोज रात्री जेवण काय बनवावे याबद्दल सहमती असते का? हे माहीत करुन घेणे खूप महत्त्वाचे असते”.

त्या पुढे लिहितात की, “तुम्ही बेडरुममध्ये एकमेकांना किती महत्त्व देतात? छोट्या छोट्या गोष्टींवरुन होणारी भांडणं सोडवू शकतात का? थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही एकमेकांसाठी योग्य आहात का? हे समजणे महत्त्वाचे असते. आपला भारतीय समाज लग्नाआधी एकत्र राहण्याला पाप समजतो. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला समाज पाप समजतो”.

झीनत यांच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले असून त्यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रियादेखील येत आहेत. झीनत यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्या लवकरच अभय देओल व शाबाना आजमीबरोबर ‘बन-टिक्की’ या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.      

Tags: bollywood actressinstagram postlive in relationshipZeenat aman
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Amruta Khanvilkar On Trollers

“मीही धर्माने मराठी पण…”, घाणेरड्या व लाजिरवाण्या शब्दांत ट्रोल करणाऱ्यांना अमृता खानविलकरने सुनावलं, म्हणाली, “तुमचे संस्कार…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.