बॉलिवूडमधील ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन ही जोडी अधिक चर्चेत आहे. लग्नाच्या १७ वर्षानंतर दोघंही घटस्फोट घेऊन वेगळे होणार आशा चर्चादेखील सर्वत्र सुरु आहेत. मात्र या सगळ्यांवर अभिषेक व ऐश्वर्या यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ‘दसवी’ या चित्रपटादरम्यान अभिषेकची निमरत कौरबरोबर ओळख झाली आणि त्याचवेळी निमरत व अभिषेक यांच्यामध्ये जवळीक वाढल्याने ऐश्वर्याबरोबर घटस्फोट असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या व्यतिरिक्त श्वेता बच्चन व जया बच्चन यांच्यासंबंधित कौटुंबिक समस्या हेदेखील त्यांचे वेगळे होण्याचे कारण सांगितले जात आहे. अशातच आता ऐश्वर्या व आराध्याबद्दल कोणत्याही चर्चा न करण्याचा निर्णय बच्चन कुटुंबाने घेतला आहे. (amitabh bachachan on aishwarya rai bachchan)
सध्या टेलिव्हीजनवर ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी ‘कजरा रे’ या गाण्याबद्दल चर्चा केली. अमिताभ यांनी अभिषेक व रानी मुखर्जी यांच्याबद्दल बोलले मात्र त्यांनी ऐश्वर्याबद्दल काहीही चर्चा केली नाही. या गाण्यामध्ये अमिताभ, अभिषेक व ऐश्वर्या यांनी एकत्रित डान्स केला होता. या सगळ्यामुळे प्रेक्षकदेखील आचंबित झाले.
आणखी वाचा – पाच महिन्यांनी वरुन धवनने केला लेकीच्या नावाचा खुलासा, नावही आहे अगदी युनिक, म्हणाला…
एका एपिसोडमध्ये अमिताभ यांनी नातवंडांबद्दल चर्चा केली. अगस्त्य नंदा व नव्या नवेलीबद्दलदेखील बोलले. पण आराध्याबद्दल त्यांनी बोलणं टाळलं. ‘कजरा रे’ या गाण्याबद्दल चर्चा करताना ऐश्वर्याबद्दल चर्चा न केल्याने ऐश्वर्या व बच्चन कुटुंबं वेगळं होणार असल्याच्या चर्चा अधिक सुरु झाल्या.
गेल्या एका वर्षापासून ऐश्वर्या व अभिषेक यांच्या नात्यामध्ये तणाव असल्याचे समोर आले होते. मात्र मध्यंतरी दुबई एअरपोर्टवर ऐश्वर्या, अभिषेक व आराध्या एकत्रितपणे दिसून आले होते. मात्र त्यावेळी त्यांच्यामध्ये सगळं काही ठीक असल्याचंदेखील बोललं गेलं. अशातच आता अमिताभ यांच्या व्यक्तव्यामुळे आता सर्वत्र चर्चा सुरु झाल्या आहेत. आता ऐश्वर्या व अभिषेक यांच्या नात्याबद्दल नक्की काय सुरू आहे? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.