रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लव्ह जिहादसारखं…”, सोनाक्षी सिन्हा व जहीर इकबालच्या लग्नाबाबत भडकली स्वरा भास्कर, म्हणाली, “दोघांना मुल झालं तर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 19, 2024 | 6:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
swara bhaskar on sonakshi sinha

"लव्ह जिहादसारखं...", सोनाक्षी सिन्हा व जहीर इकबालच्या लग्नाबाबत भडकली स्वरा भास्कर, म्हणाली, "दोघांना मुल झालं तर..."

 बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही सतत चर्चेत असते. ती नेहमी बेधडक व वादग्रस्त वकतव्यांमुळेदेखील ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी शाकाहारी ब्लॉगरला सुनावल्यामुळे चर्चेत आली होती.  आता पुन्हा एकदा तिने सोनाक्षी सिन्हा व जहीर इक्बाल यांच्या लग्नावर भाष्य केले आहे. स्वराने देखील आंतरधर्मीय विवाह केला. आता सोनाक्षीही आंतरधर्मीय विवाह करत असल्याने स्वरा तिला पाठिंबा देत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. जाणून घेऊया स्वरा नक्की काय म्हणाली आहे ते. (swara bhaskar on sonakshi sinha)

सोनाक्षी व जहीर यांच्या लग्नाची चर्चा गेली खूप दिवस सोशल मीडियावर पहायाल मिळत आहे. या महिन्यात दोघंही लग्नबंधनात अडकतील अशी चर्चादेखील सुरु आहे. सोनाक्षी मुसलमान मुलाबरोबर लग्न करत असल्याने लोकांनी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली आहे. अशातच आता स्वराने या वदात उडी घेतली आहे. तसेच ‘लव्ह जिहाद’बद्दलच्या सर्व मिथकांबद्दल भाष्य केले आहे.

आणखी वाचा – “बाळाचं प्लॅनिंग कधी करणार?”, चाहत्याने प्रेग्नंसीबाबत तितीक्षा तावडेला विचारला प्रश्न, अभिनेत्री म्हणाली, “अजून आम्ही…”

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

स्वराला सोनाक्षी व जहीर यांच्या नात्याबद्दल विचारले असता तिने सांगितले की, “माझ्या लग्नादरम्यान समाजातील अनेक तज्ञांनी सल्ले दिले होते. पण आम्ही आता समजूतदार लोकांबद्दल बोलत आहोत. ते त्यांच्या खासगी आयुष्यात काय करत आहेत, ते लग्न करणार आहेत की नाहीत हे सगळं त्यांच्यावरच अवलंबून आहे”.

आणखी वाचा – “रस्त्यावर भांडणारी शोमध्ये का?”, ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये व्हायरल वडापाव गर्लच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षक भडकले, म्हणाले, “तिने असं काय केलं?”

पुढे ती म्हणाली की, “जर ते एकत्र राहत असतील तर, कोर्टात लग्न किंवा निकाह करणार असतील किंवा आर्य समाजपद्धतीने लग्न करणार असतील तर त्यासाठी कोणालाही काहीही देणंघेणं नसावं. हे सगळं त्यांच्या कुटुंबा अंतर्गत असणारी गोष्ट आहे. हे सोनाक्षीचं आयुष्य आहे. तिने तिचा जोडीदार निवडला आहे आणि तिच्या जोडीदाराने तिला निवडलं आहे. हा त्यांचा खासगी प्रश्न आहे. या सगळ्यामुळे उगाचच चर्चा करुन लोक वेळ वाया घालवत आहेत”.

त्यानंतर ती म्हणाली की, “उद्या जर सोनाक्षी व जहीरचे लग्न झाले आणि त्यांचे मूल जन्माला आले तर त्या मुलाच्या नावावरुन अजून वाद सुरु होतील. हे कधीही संपणार नाही. सैफ व करीनाच्या मुलांच्या नावावरुन किती चर्चा झाली हे सगळ्यांनी पाहिलंच आहे”.  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, १९ जून रोजी म्हणजे आह सोनाक्षी व जहीर यांचा संगीतसोहळा पार पाडणार आहे. तसेच २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.

Tags: sonakshi Sinhaswara bhaskarweddingZaheer Iqbal
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Marathi Actress Kranti Redkar gave reply to the person who commented on her video know more

"तुम्ही अति करता असं वाटत नाही का?", व्हिडीओवर कमेंट करणाऱ्याला क्रांती रेडकरचं उत्तर, म्हणाली...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.