शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुस्लिम मुलाबरोबर लग्न करण्यावरुन सोनाक्षी सिन्हाच्या घरातले नाराज, मामा म्हणाले, “लग्नात वडील येतील पण…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 18, 2024 | 1:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress Sonakshi Sinha's uncle talked about Shatrughan will be go her daughter’s wedding.

मुस्लिम मुलाबरोबर लग्न करण्यावरुन सोनाक्षी सिन्हाच्या घरातले नाराज, मामा म्हणाले, “लग्नात वडील येतील पण...”

‘हिरामंडी’ या सीरिजमुळे व स्वत:च्या लग्नामुळे सध्या चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा. येत्या २३ जून रोजी सोनाक्षी तिच्या कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न करणार असल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरला होत आहेत. अशातच आता तिच्या लग्नाबाबतची आणखी माहिती समोर येत आहे. येत्या १९ जूनला सोनाक्षी व झहीर यांचा संगीत सोहळा आहे, तर २२ जूनला त्यांचा साखरपुडा होणार आहे. त्यानंतर २३ जूनच्या संध्याकाळी दोघेही शिल्पा शेट्टीच्या ‘बॅस्टियन’ रेस्टॉरंटमध्ये दोघे रिसेप्शन पार्टी देणार आहेत.

पण या सगळ्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे की, सोनाक्षीचे कुटुंब या लग्नाला हजेरी लावणार का? कारण या लग्नाबाबत वडील शत्रुघ्न सिन्हा आणि भाऊ लव सिन्हा यांचा कल फारसा चांगला नाही. दोघांनीही या लग्नाबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले आहे.  पण आता सोनाक्षीचे मामा पहलाज निहलानी यांनी सांगितले आहे की, शत्रुघ्न सिन्हा आपल्या मुलीच्या लग्नाला हजर राहतील आणि तिला आशीर्वाद द्यायला नक्कीच येतील.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

ज्येष्ठ चित्रपट निर्माते व सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी ‘टाइम्स नाऊ’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या लग्नात उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले. कुटुंबातील मतभेदाच्या अफवांचे खंडन करताना पहलाज निहलानी यांनी असं म्हटलं की, ‘लोकसभा निवडणुकीमुळे शत्रुघ्न सिन्हा जवळपास तीन महिने मुंबईबाहेर होते. वहिनीला (पूनम सिन्हा) माहित असेलच. ते परतल्यानंतर तिने वडिलांना याबद्दल सांगायचे ठरवले असावे. आता ते मुंबईत परतले आहेत आणि सोनाक्षी आणि तिच्या कुटुंबात सर्व काही ठीक आहे”.

आणखी वाचा – “महाराजांनी दुसऱ्या धर्माचा अनादर करायला शिकवलं का?”, ईदबाबत बोलल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना मराठी अभिनेत्रीचं उत्तर, म्हणाली, “गीतेतला…”

यापुढे शत्रुघ्न सिन्हा यांना सोनाक्षीच्या लग्नाबद्दल राग आहे का, असे विचारले असता पहलाज यांनी असं म्हटलं की, “हो, पण ते जास्त काळ रागावू शकत नाहीत. सोनाक्षीवर तर नक्कीच नाही. ती त्यांची लाडकी आहे. लग्नाला न येण्याचा प्रश्नच येत नाही. शत्रुजींनी सांगितल्याप्रमाणे आजकालची मुलं पालकांची परवानगी घेत नाहीत आणि आपल्या आवडीच्या मुलाशी लग्न केल्यास त्यांना राग का येईल? खुद्द शत्रुजींनी चाळीस वर्षांपूर्वी आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले होते”.

आणखी वाचा – रुपालीला नवीन शक्ती मिळाली, नेत्रा गरोदर असल्याचेही सत्य तिला समजणार, कुणाचा बळी की आणखी काही?

दरम्यान, सोनाक्षी सिन्हा व  झहीर इक्बाल यांनी २०२२मध्ये ‘डबल एक्सएल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. सोनाक्षीला सलमानने चित्रपटांमध्ये लाँच केले होते. त्याचबरोबर झहीर इक्बालने पदार्पण केलेला ‘नोटबुक’ हा चित्रपटाला सलमान खानची निर्मिती होती. तसेच झहीर इक्बाल व सोनाक्षी यांची पहिली भेट सलमानच्या एका पार्टीत झाली होती.

Tags: Bollywood entertainment newssonakshi SinhaSonakshi Sinha MarriageSonakshi Sinha Marriage News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
tharal tar mag

सायलीबरोबर अर्जुनही वटपौर्णिमेला वडाला मारणार सात फेऱ्या, जन्मोजन्मी हाच पती मिळण्याची इच्छाही केली व्यक्त, नातं आणखी बहरणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.