बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सतत चर्चेत असते. २०१० साली ‘दबंग’ या चित्रपटातून अभिनेता सलमान खानबरोबर मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. मात्र सध्या ती तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. २३ जून रोजी ती तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यानंतर दोघांचे हनीमूनचे फोटोदेखील समोर आले आहेत. या फोटोंनाही चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. (sonakshi sinha on married life)
सोनाक्षी व झहीरचे लग्न नोंदणी पद्धतीने मुंबई येथे येथे पार पडले. त्यानंतर त्यांनी बॅस्टीयन रेस्टॉरंटमध्ये रिसेप्शन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी बॉलीवूडमधील कलाकारांनी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांच्या या सोहळ्याची चर्चादेखील मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. मात्र सोनाक्षीने एका मुस्लिम मुलाबरोबर लग्न केल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिकादेखील करण्यात आली. अनेकांनी या विवाहाला लव्ह जिहादचेदेखील नाव दिले. पण या सगळ्या चर्चाकडे लक्ष न देता ती झहीरबरोबर सुखात असल्याचेही तिने सांगितले.
आणखी वाचा – Video : नातवंडांबरोबर नीता-मुकेश अंबानींचा भन्नाट डान्स, जावयालाही नाचवलं, जगभरात चर्चा
तिने या प्रकरणावर भाष्य केले असून ती म्हणाली की, “माझं आयुष्य पहिलं इतकं चांगलं कधीही नव्हतं. हे सगळं इतकं छान आहे की लग्न झाल्यानंतरही तसंच फील करत आहे. मला खूप आनंद होत की माझं आयुष्य लग्नाआधीही चांगलं होतं आणि लग्नानंतरही मी खूप आनंदात आहे. मी पुन्हा काम सुरु केलं असून खूप खुश आहे”.
सोनाक्षी तिच्या आयुष्यात खूप खुश आहे. सोनाक्षीने जेव्हा हनीमूनचे फोटो शेअर केले होते तेव्हा त्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती. तसेच त्यावर खूप प्रतिक्रियादेखील दिल्या होत्या. यामुळे सोनाक्षी व झहीरने कमेंट बॉक्स ऑफ ठेवला होता.सोनाक्षीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तिचा लग्नाआधी ‘बडे मीया छोटे मिया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.