अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिने साकारलेल्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. जून महिन्यात ती तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल बरोबर लग्नबंधनात अडकली. तिने मुंबईमधील राहत्या घरी लग्नबंधनात अडकली. पण ज्या घरात तिने लग्न केले ते घर ती विकत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण ती असे का करत आहे? याचे उत्तर मात्र मिळू शकले नाही. याबद्दलची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (sonakshi sinha home)
आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. २०२३ साली ती या घरामध्ये शिफ्ट झाली होती. मात्र हे घर आता तिने विकण्यास काढले आहे. रियल इस्टेटशी संबंधित एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सोनाक्षीच्या या घरासंबंधी माहिती देण्यात आली आहे. तसेच एक व्हिडीओदेखील शेअर करण्यात आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हे घर सोनाक्षीचे असल्याचा खुलासा करण्यात आला नाही. मात्र एका नेटकऱ्याने हे घर सोनाक्षीचे असल्याचे ओळखले. या व्हिडीओमध्ये असणारे घर हे सोनाक्षीच्या घरसारखेच आहे. काही महिन्यांपूर्वी तिने तिचे घर चाहत्यांना दाखवले होते. त्यामुळे आता हे घर सोनाक्षी विकत आहे असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे.
इतकेच नाही तर, सोनाक्षीच्या या घराची झलक तिच्या व झहीरच्या लग्नाच्या फोटोंमध्येही दिसली. The Property Store ने घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे कि, “वांद्रे वेस्ट एरियामध्ये २bhk, ४२०० स्क्वेअर फुट कार्पेट एरिया तसेच सी व्ह्यू आहे”, व्हिडीओ संपताच या घराची किंमत समोर आली. या घराची किंमत २५ कोटी रुपये असल्याचे समजले.
सोनाक्षीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, जुलै महिन्यात तिचा ‘काकुडा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात तिच्याबरोबर रितेश देशमुखदेखील दिसून आला होता. तसेच आता ‘निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस’मध्ये दिसून येणार आहे. पण याची घोषणा अद्याप करण्यात आली नाही.