शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सोनाक्षी सिन्हाच्या आई व सासूला हवी आहेत नातवंड, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “नातवंडांशिवाय …”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 25, 2024 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sonakshi sinha funny reel

सोनाक्षी सिन्हाच्या आई व सासूला हवी आहेत नातवंड

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर यांच्या लग्नाला आता सहा महीने पूर्ण झाले आहेत. जून २०२४ मध्ये दोघंही लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर दोघंही अनेक ठिकाणी फिरताना दिसत आहेत. त्यांचे परदेशदौऱ्याचे अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. अमेरिका, इटली, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया, तसेच भारतातील अनेक ठिकाणी त्यांनी फिरण्याचा आनंद घेतला आहे. सोनाक्षी या दरम्यान सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते. सोनाक्षीने नुकतेच एक मीम शेयर केले आहे. या मीममध्ये फिरण्यामुळे आई व सासू कशा प्रतिक्रिया देतात? याबद्दल सांगितले आहे. (sonakshi sinha funny reel)

सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर एक विनोदी रील शेयर केले आहे. यामध्ये विमानाच्या आतील फोटो आहे तसेच यावर सिलियन मर्फीचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच लिहिले आहे की, “माझी आई व सासू आम्हाला बघत हा विचार करत आहेत की नातवंडाशिवाय हे लोक फिरत आहेत”. सोनाक्षीने हे मीम शेयर करत झहीरला टॅग केले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सोनाक्षी गरोदर असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. मात्र सोनाक्षीने गरोदर नाही तर जाड झाली आहे असं सांगितलं होतं.

आणखी वाचा – कोणी अगदी कमी खर्चात, तर कोणी शाही थाटात केलं लग्न, मराठी कलाकारांची लग्न या वर्षात सर्वाधिक चर्चेत, सुखाने करत आहेत संसार

गरोदरपणाच्या चर्चावर सोनाक्षी म्हणाली की, “सोनाक्षीने गरोदरपणाच्या चर्चांवर भाष्य केले. ती म्हणाली, “मला हे सांगायचं आहे की मी गरोदर नाही. मी फक्त जाड झाले आहे”. दरम्यान एका नेटकऱ्याने सोनाक्षीला गरोदर असल्या कारणाने शुभेच्छादेखील दिल्या होत्या. सोनाक्षी पुढे म्हणाली की, “लग्नानंतर फिरण्यात आणि लंच-डिनरमध्येच आम्ही व्यस्त आहोत. त्यामुळे इतर कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नाही”.

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचे लगीनघाई, थाटात पार पडला मेहंदी सोहळा, लवकरच अडकणार विवाहबंधनात

दरम्यान, सोनाक्षी आणि झहीरने दोघांनी एकमेकांना ७ वर्षे डेट केल्यानंतर यावर्षी २३ जून रोजी मुंबईत लग्न केले. झहीर आणि सोनाक्षीने एकत्र काम केले आहे. दोघे ‘डबल एक्सएल’मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटात हुमा कुरेशीही महत्त्वाच्या भूमिकेत होती. दोघे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात . सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात आणि चाहतेही या दोघांच्या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद देतात. 

Tags: fun reelinstagramsonakshi Sinha
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
prathmesh laghate-mugdha vaishampayan first wedding anniversary

लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायनचं जोरदार सेलिब्रेशन, खास रोमॅंंटिक डेट अन्…; Photo Viral

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.