शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडील लेकीच्या लग्नासाठी नाराज, सोनाक्षी सिन्हाने अखेर सोडलं मौन, म्हणाली, “माझी मर्जी, आई-वडिलांना…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 12, 2024 | 1:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sonakshi sinha on wedding

वडील लेकीच्या लग्नासाठी नाराज, सोनाक्षी सिन्हाने अखेर सोडलं मौन, म्हणाली, "माझी मर्जी, आई-वडिलांना..."

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही अधिक चर्चेत असते. आजवर सोनाक्षीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. २०१० साली तिने सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील सोनाक्षीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. ती वेगवेगळ्या चित्रपटामध्ये भूमिका साकारत गेली आणि सध्या मनोरंजन क्षेत्रांमध्ये तिने आपले एक वेगळे अस्तित्त्व निर्माण केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. स्वतःचे अनेक फोटो व व्हिडीओ ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. (sonakshi sinha on wedding)

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी म्हणून चित्रपत्रसृष्टीमध्ये येण्यापूर्वी तिची ओळख होती. मात्र आता एक चतुरस्त्र अभिनेत्रीमध्ये सोनाक्षीचे नाव घेतले जाते. मात्र सध्या ती अभिनयामुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोनाक्षीचे नाव गेले अनेक दिवसांपासून जहीर इक्बाल बरोबर जोडले जात आहे. या महिन्यात दोघंही लग्न करु शकतात अशा चर्चादेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या. मात्र सोनाक्षी व जहीर यांनी आपल्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केली नाही. मात्र एकमेकांना खूप कालावधीपासून एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्नबंधनात अडकतील अशा आशयाची पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली.

आणखी वाचा – “सकाळी सकाळी पोलिसांनी पकडलं आणि…”, संकर्षण कऱ्हाडेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, “मला त्यांच्याबरोबर…”

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

मात्र आता स्वतः सोनाक्षीने यावर मौन सोडले आहे. नुकत्याच तिने एका मुलाखतीमध्ये याबद्दल भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कोणाचेही काम नाही. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे, ही माझी मर्जी आहे. त्यामुळे लोकं माझ्यासाठी इतके का चिंतेत आहेत हे मला समजत नाही. लोक माझ्यापेक्षा जास्त माझ्या आई-वडिलांना माझ्या लग्नाबद्दल विचारत आहेत. खरं सांगायचं तर मला खूप मजा येत आहे पण आता मला या सगळ्यांची सवयदेखील झाली आहे. लोकांना खूप उत्सुकता आहे. पण त्याला आम्ही काय करु शकतो?”.

आणखी वाचा – अधिपती-अक्षरामध्ये जवळीक, स्वयंपाकघरातच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले, मात्र भुवनेश्वरीला आनंद पाहवेना

याबद्दल वडील शत्रुघ्न यांचे भाष्य देखील चर्चेत आले होते. ते म्हणाले होते की, “आजकालची मुलं कुठे काय विचारतात? ते फक्त सांगतात. जितकं सोशल मीडियावर आहे तितकीच माहिती मला सोनाक्षीबद्दल आहे. याव्यतिरिक्त सोनाक्षीने मला काहीही सांगितले नाही. पण जेव्हा तिचे लग्न असेल तेव्हा मी खूप नाचेन”.

दरम्यान सोनाक्षीच्या लग्नाच्या वृत्तामध्ये किती तथ्य आहे हे लवकरच समजेल.

Tags: bollywood actresssonakshi SinhaweddingZaheer Iqbal
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sonakshi Sinha Wedding

मुस्लिम मुलाबरोबर लग्न करण्यावरुन सोनाक्षी सिन्हावर वडील व भाऊ नाराज?, शत्रुघ्न सिन्हांच्या एका वक्तव्यामुळे सगळीकडे खळबळ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.