काही दिवसांपूर्वी बॉलीवूड व साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान हिच्या डीपफेक व्हिडिओमुळे मनोरंजन सृष्टीत एकच खळबळ उडाली होती. अभिनेत्रीचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल होताच सिनेसृष्टीतील अनेकांनी या तंत्रज्ञानाचा निषेध करत त्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. स्वत: रश्मिकाने याविरुद्ध पोलिस तक्रार केली असून तिला बिग बींनीदेखील पाठिंबा दिला असल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच आता या संपूर्ण प्रकारणाबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. रश्मिका मंदाना डीपफेक व्हिडीओ प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ नोव्हेंबर महिन्यात व्हायरल करण्यात झाला होता. त्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणात मुख्य आरोपीला शनिवारी दिल्ली पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली आहे. यापूर्वी तपासादरम्यान बिहारमधील १९ वर्षीय तरुणाची चौकशी केली होती. त्यानंतर आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला व्यक्ती, आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी असून, तो चेन्नईतील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी-टेक पदवीधर आहे. IFSO युनिटचे पोलिस उपायुक्त हेमंत तिवारी यांनी सांगितले की, “इमानी नवीन नामक मुलगा सोशल मीडियावर फॅन पेज चालवायचा. रश्मिका मंदान्नासह आणखी दोन प्रख्यात सेलिब्रिटींसाठी त्याने आणखी दोन फॅन पेज तयार केले होते. मात्र, या व्हिडीओवरुन अवघ्या देशभरात गदारोळ माजल्यामुळे हा तरुण घाबरला.”
Expressing my heartfelt gratitude to @DCP_IFSO ???????? Thank you for apprehending those responsible.
— Rashmika Mandanna (@iamRashmika) January 20, 2024
Feeling truly grateful for the community that embraces me with love, support and shields me. ????????
Girls and boys – if your image is used or morphed anywhere without your consent. It…
दिल्ली पोलिसांनी शनिवारी तिच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर रश्मिका मंदान्नाने पोलिसांचे आभार मानले आहेत. रश्मिकाने एक्स (ट्विटर) पोस्टद्वारे असे म्हटले आहे की, “@DCP_IFSO बद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करत आहे. या प्रकरणी आरोपी लोकांना पकडल्याबद्दल धन्यवाद. या काळात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या, मला शक्ती, समर्थन व प्रेम दिलेल्या समुदायाबद्दल, लोकांबद्दल मी खरोखर कृतज्ञ आहे. मुला-मुलींनो तुमच्या संमतीशिवाय तुमचे फोटो व व्हिडीओ कुठेही वापरले जाणे किंवा मॉर्फ करणे हे चूक आहे. तुम्ही कायम अशा व्यक्तींच्या अवतीभवती राहा, जे तुम्हाला या काळात पाठिंबा देतील आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”
दरम्यान, रश्मिकाच्या व्हायरल व्हिडीओमधील मुलगी रश्मिका नव्हे तर झारा ही ब्रिटिश-भारतीय वंशाची तरुणी होती. एआयचे डीपफेक तंत्रज्ञान वापरून रश्मिका मंदानाचा चेहरा झाराच्या त्या व्हिडीओवर लावण्यात आला होता.