बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण व रणवीर सिंह सध्या खूप चर्चेत आले आहेत. गणपती उत्सवादरम्यान दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. त्यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. तिच्या चाहत्यांनी तसेच बॉलिवूड सर्वच कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. बाळाच्या आगमनाने दीपिका व रणवीरच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. पण अशातच आता अभिनेत्री राखी सावंतने दीपिका व रणवीरला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिने आपला आनंद व्यक्त केला आहे. तिचा याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (rakhi sawant on ranveer singh and deepika padukone baby)
समोर आलेल्या व्हीडीओमध्ये राखी खूप खुश दिसून येत आहे. ती रणवीर व दीपिकाला फ्लाईंग किस देताना देत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ती म्हणते की, “अखेर मी मावशी झाले. दीपिका तुला आठवतंय का? आपण एकत्रित डान्स क्लासला गेलो आहोत. आपण करियरची सुरुवात एकत्रित केली आहे. तू मोठी अभिनेत्री झालीस. पत्नी झाली आता तर आई झालीस”.
त्यानंतर एक बाहुली खरेदी केली आणि म्हणाली की, “मी तुमच्या मुलीसाठी एक बाहुली खरेदी करत आहे”. यानंतर तिने खूप सारी खेळणी खरेदी केली. राखीच्या या व्हिडीओवर नेटकरी खूप प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “जबरदस्तीने नाते जोडण्याचा प्रयत्न करत आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “हिला कोणीही मागे टाकू शकत नाही. उर्फीपण नाही”, तसेच अजून एकाने लिहिले की, “बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवना”.
दरम्यान जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी देखील दीपिका पदुकोणच्या मुलीला पाहण्यासाठी आणि या जोडप्याचे अभिनंदन करण्यासाठी स्वतः रुग्णालयात पोहोचले. मुकेश अंबानी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. रणवीर सध्या वडील झाल्याने लेकीची सेवा करण्यात व्यस्त आहे. आता काही महिन्यांनंतर रणवीर व दीपिका दोघेही या दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार आहेत. दीपिका शेवटची ‘कल्की 2898 एडी’ मध्ये दिसली होती आणि या चित्रपटातही तिने गर्भवती महिलेची भूमिका साकारली होती, त्यानंतर चित्रपटात दिसलेली तिची प्रेग्नन्सी खरी असल्याचे सांगण्यात आले. ‘सिंघम अगेन’नंतर रणवीर सिंग ‘डॉन ३’वर काम सुरु करणार आहे. याशिवाय रणवीर आदित्य धरच्या पुढील चित्रपटातही दिसणार आहे.