नितू सिंह या बॉलीवूडमधील सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजवर ८० व्या दशकापासून आजवर त्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेमदेखील मिळाले आहे. नितू त्यांच्या व्यावसाईक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत राहिल्या आहेत. नितू यांनी अभिनेता ऋषि कपूर बरोबर लग्न केले. त्यांची प्रेमकहाणीदेखील अधिक चर्चेत राहिली आहे. अनेकदा त्यांनी ऋषि व त्यांच्या नात्यावर भाष्य केले आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी ऋषि यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. (neetu kapoor on rishi kapoor extramarital affair)
नीतू या सध्या चित्रपट व काही कार्यक्रमांमध्ये दिसून येतात. तसेच अनेक ठिकाणी मुलाखतीदेखील देत असतात. त्यांनी आजवर आपल्या खासगी आयुष्यावर अनेकदा चर्चा केली आहे. आता त्यांनी ऋषी यांच्या विवाहबाह्य संबंधावर चर्चा केली. याबद्दल त्यांनी ऋषी यांच्याबरोबर चर्चा केली तसेच त्या दूरदेखील गेल्या.
समोर आलेल्या माहितीनुसार, नीतू यांनी ऋषि यांच्या विवाहबाह्य संबंधांना वन नाइट स्टँड असेही म्हंटले होते. अनेकदा त्यांच्यामध्ये भांडणंदेखील होत होती. मात्र त्यानंतर ऋषि यांच्या वागण्याचा नीतू यांना फरक पडणं बंद झालं. त्यांनी ऋषी यांच्याकडे लक्ष देणं सोडलं आणि दूर जाऊ लागल्या. ऋषि यांच्याबद्दल नीतू एकदा म्हणाल्या होत्या की, “मला विश्वास होता की ऋषि माझ्याशिवाय राहू शकत नाहीत”. ऋषि यांनी त्यांचे संबंध नीतू यांच्यापासून लपवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र नीतू यांना ते समजत असतच. नितू यांचे सगळे मित्र येऊन ऋषि यांच्या नात्याबद्दल येऊन सांगत असत असेही त्यांनी एकदा सांगितले होते.
नीतू यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, या आधी ‘जुग जुग जियो’ या चित्रपटामध्ये दिसून आल्या होत्या. त्यांच्याबरोबर या चित्रपटात अनिल कपूर, वरुण धवण, कियारा आडवाणी, प्राजक्ता कोळी हे कलाकार दिसून आले होते. लवरकच त्या अजून काही चित्रपटांमध्ये दिसतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.