मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पैशांसाठी घाणेरड्या भूमिका केल्या अन्…”, नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “सगळ्या गोष्टी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 25, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
neena gupta on career struggle

"पैशांसाठी घाणेरड्या भूमिका केल्या अन्…", नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, "सगळ्या गोष्टी…"

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या सतत चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री आहेत. सध्या ‘पंचायत ३’च्या निमित्ताने चर्चेत आहेत. ‘पंचायत’ या वेबसिरिजचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. येत्या २८ मे रोजी तिसरा भाग येणार असून सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. नीना या वेबसिरिजमध्ये गावच्या प्रधान मंजू देवी यांची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले आहे. या दरम्याने आता नीना यांच्या करियरच्या सुरुवातीच्या काळातील चर्चा अधिक रंगल्या आहेत. स्वतः नीना यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे. (neena gupta on career struggle )

नीना यांनी १९८२ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. करियरच्या सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्याबद्दल त्यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, “सुरुवातीच्या तीन महिन्यातच स्वतःची बॅग घेऊन मुंबई सोडण्याचा विचार केला होता. मी दिल्लीची असल्याने मुंबईमध्ये जगणे थोडे कठीण वाटत होते. शिक्षित असल्याने दिल्लीला परत जाऊन पुढे शिक्षण घेत पीएचडी करण्याचा विचार करत होते. मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी हाताळणे कठीण झाले होते”.

आणखी वाचा – प्रत्येक फोटोचे पैसे घेतात आणि…; जान्हवी कपूरने पापाराझी छायाचित्रकारांची केली पोलखोल, पैसे दिले तरच विमानतळावर राहतात हजर, कसे कमावतात पैसे?

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “मी उद्या निघून जाईन असा विचार केला होता पण एखादे काम मिळेल अशी आशा होती. असे माझ्याबरोबर अनेकदा झाले. गरजेनुसार बदल होत गेले. सुरुवातीला पैशांची गरज असल्याने घाणेरड्या भूमिका कराव्या लागल्या. त्यामुळे हे चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ नयेत अशा प्रार्थना मी करत होते. पण सध्या मी अशा ठिकाणी आहे जिथे मी कोणालाही नाही असे म्हणू शकते”.

आणखी वाचा – बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सिकंदर भारती यांचे निधन, ६०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कलाकारही हळहळले

नीना यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर आता ‘पंचायत ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नवीन भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्याचप्रमाणे नीना सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असून आपले विचार रोकठोकपणे मांडत असतात.

Tags: bollywood actresscareer struggleneena gupta
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
26 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

सूर्यदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचे नशीब उजळणार, रविवारचा दिवस कुणासाठी असणार भाग्याचा?, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.