एखाद्या विषयावर खुलेपणाने बोलणं काही कलाकारांना आवडतं. मात्र उत्साहाच्या भरात केलेलं वक्तव्य आणि त्यानंतरचं ट्रोलिंग सहन करावं लागतं. कित्येक कलाकार तर ट्रोलिंगच्या भीतीनेच खुलेपणाने बोलणं टाळतात. मात्र सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता या बेधडकपणे आपलं मत मांडतात. ट्रोलिंगकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन एखाद्या विषयावर बोलायचं असेल तर त्या बिनधास्त बोलतात. सामाजिक, महिला, चित्रपट, इतर वाद असो वा शारीरिक संबंध असो नीना याबाबत आवर्जुन मत मांडतात. मध्यंतरी त्यांनी केलेलं वक्तव्य तुफान गाजत आहे. कपिल शर्मच्या शोमध्ये नीना भलतंच बोलून गेल्या. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (neena gupta on pamela anderson)
नक्की काय बोलून गेल्या नीना गुप्ता?
नीना यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा कपिल शर्माच्या शोमधील आहे. खूप महिन्यांपूर्वी आधी त्या एका प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये उपस्थित होत्या. त्यावेळी कपिल त्यांना विविध प्रश्न विचारत होता. नीना यांचे सहकलाकारही त्यावेळी उपस्थित होते. कपिलने नीना यांना हॉलिवूड वेबसीरिज ‘बेवॉच’ मधील पामेला एंडरसन संबंधित प्रश्न विचारला. यादरम्यान त्यांनी दिलेलं उत्तर अनेकांच्या भुवया उंचावणारं होतं.
आणखी वाचा – Video : औक्षण, कुटुंबाला अभिमान अन्…; गौरव मोरेने खरेदी केली पहिली महागडी गाडी, पाया पडला तेव्हा…
स्तनांबाबत कमेंट अन्…
कपिलने नीना यांना विचारलेलं की, “हॉलिवूड वेबसीरिज ‘बेवॉच’मध्ये पामेला एंडरसनची भूमिका तुम्ही करणार होतात अशी अफवा होती”. यावर नीना यांनी दिलेलं उत्तर थक्क करणारं होतं. त्या म्हणालेल्या, “माझ्या स्तनांचा आकार तिच्यासारखा एवढा मोठा नाही”. त्यांचं हे उत्तर ऐकून मंचावर उपस्थितही सारेजण आश्चर्यचकीत झाले. इतकंच नव्हे तर नीना यांच्या काही सहकलाकारांनी मानच खाली घातली.
पाहा व्हिडीओ
आणखी वाचा – पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…; जान्हवी कपूरचा मुद्दा योग्यच, तुम्हाला पटला का?
नीना यांचं उत्तर ऐकून शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांनाही हसू अनावर झालं. तर काहींनी कानावर हातच ठेवला. उत्तर ऐकल्यानंतर कपिलने नीना यांना हा कौटुंबिक शो आहे, इथे वेगळ्या अर्थाचे जोक केले जात नाही असं सांगितलं. कपिलचं हे बोलणं ऐकून नीना यांनी लगेचच त्याला प्रतिउत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “तूच वेगळा अर्थ निघेल असा प्रश्न का विचारतोस?”. यापूर्वीही नीना यांनी “महिलांनी सेक्सचा आनंद घ्या” असं म्हणत चर्चेचा विषय ठरल्या होत्या. आता त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा फायद्याचा की तोट्याचा हे मोठं कोडंच आहे.